Nagpur : गंभीर अन् दुर्मिळ आजारामुळे पंगू झालेला चिमुकला चालत गेला घरी ; डॉक्टर बनले देवदूत

कोरोनानंतर वाढले ‘गुलियन बेरी सिंड्रोम’चे रुग्ण
-डॉ. अमित भाटी,मेंदूरोग तज्ज्ञ नागपूर.
-डॉ. अमित भाटी,मेंदूरोग तज्ज्ञ नागपूर.sakal
Updated on

नागपूर : अवघ्या १४ वर्षांच्या एका मुलाला दुर्मिळ अशा‘गुलियन बेरी सिंड्रोम’ या असाध्य व्याधीने ग्रासले. त्यामुळे रोज खेळणारा मुलगा अचानक लुळा पांगळा झाला. पण डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी त्याचा जीव तर वाचलाच पण तब्बल ४० दिवसांनी हा मुलगा स्वतःच्या पायावर उभा झाला. कोविड नंतर या आजारात वाढ झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

मूळचा अकोला येथील प्रणब ढोंबरे हा शाळकरी मुलहा शाळेत जातानाच अचानक लुळा पांगळा होऊन खाली कोसळला. वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्मिळ अशा‘गुलियन बेरी सिंड्रोम’ (जीबीएस) या असाध्य व्याधीने त्याला ग्रासल्याचे निदान झाले. त्याला नागपुरातील वोक्हार्ट रुग्णालयात उपचारार्थ आणले.

मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. अमित भाटी यांच्या मार्गरदर्शनात उपचार सुरू झाले. परिस्थिती बेताची होती, पण लेकराचा जीव वाचवण्यासाठी आईवडिलांनी उसनवारी केली. ४० दिवसांच्या उपचारात २८ दिवस तो व्हेंटिलेटरवर होता. रुग्णालयानेही मदत केली. योग्य उपचाराने तो बरा होऊन तो घरी परतला.

कोरोनानंतर वाढतोय ‘गुलियन बेरी सिंड्रोम’

कोरोनाच्या बाधेनंतर विविध आजारांच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. यात ‘गुलियन बेरी सिंड्रोम’ (जीबीएस) या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. पण हा अतिशय दुर्मिळ आजार असून दहा लाखांत एखादा रुग्ण या आजाराचा आढळून येतो. मात्र कोरोनानंतर वर्षभरातच सात ते आठ रुग्णांवर उपचार केल्याची माहिती डॉ. अमित भाटी यांनी दिली.

हवेवाटे हा अज्ञात विषाणू शरीरात शिरतो. दोन दिवस ते दोन आठवड्यांच्या कालावधीत स्नायू व रक्तवाहिन्यांची ताकद कमी होते. रुग्ण उभे राहण्याची ताकदच गमावून बसतो. रुग्णाची अवस्था पक्षाघात झाल्यासारखी होते. पण तातडीने निदान व उपचार झाले तर रुग्ण पूर्ण बरा होतो. सिटी स्कॅनमधून संबंधित व्यक्तीला लकवा नसल्याचे निदान झाल्यानंतर रक्त तपासणी, नसांचे स्कॅनिंग, कमरेतील पाण्याच्या अहवालातून ‘जीबीएस’चे निदान होते. या रुग्णाला ‘इमिओग्लोब्युलेंट’ची इंजेक्शन द्यावी लागतात.

-डॉ. अमित भाटी,मेंदूरोग तज्ज्ञ नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()