Nagpur : उपराजधानीत नव्या व्हायरसचा पहिला बळी

कोरोनाच्या महामारीनंतर एच-३ एन-२ हा एन्फ्लूएन्झा व्हायरस धुमाकूळ घालत आहे.
virus
virus sakal
Updated on

नागपूर : कोरोनाच्या महामारीनंतर एच-३ एन-२ हा एन्फ्लूएन्झा व्हायरस धुमाकूळ घालत आहे. या एच३एन२ व्हायरल इन्फेक्शनचा उपराजधानीत पहिला बळी गेला. या विषाणूचे रुग्ण वाढत असताना मंगळवारी (ता.१४) एक ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने ‘डेथ ऑडिट’ झाल्यावरच या मृत्यूची नोंद होणार असल्याचे स्पष्ट केले .

महानगरपालिकेच्या हद्दीतील या रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णाला ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी), मधुमेह, उच्चरक्तदाबासारख्या सहव्याधी होत्या.

उपचार सुरू असताना ९ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांची केलेली ‘एच३एन२’ची तपासणी पॉझिटिव्ह आली.

बुधवारी ‘डेथ ऑडिट’ समितीसमोर हे प्रकरण आल्यावर व त्यांनी मान्यता दिल्यावरच या मृत्यूची ‘एच३एन२’ म्हणून नोंद होईल असे डॉ. विनिता जैन, आरोग्य उपसंचालक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.