मुंबईनंतर सर्वाधिक महिला ठाणेदार नागपुरात!

दोरजे पहिल्या सहआयुक्त ; शहर राज्यात दुसरे
मुंबईनंतर सर्वाधिक महिला ठाणेदार नागपुरात!
Updated on

नागपूर : शहर पोलिस दलात मुंबईनंतर सर्वाधिक महिला पोलिस ठाणेदारांना नियुक्ती देण्यात आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यांकडे पोलिस स्टेशनचे नेतृत्व देणारे राज्यात नागपूर दुसरे आयुक्तालय आहे. सध्या शहरात चार महिला पोलिस अधिकारी ठाणेदार म्हणून कार्यरत आहेत.

उपराजधानीत सध्या ३३ पोलिस ठाणे असून आणखी तीन प्रस्तावित आहेत. त्यापैकी तब्बल चार ठाण्यांचे नेतृत्व महिला पोलिस अधिकाऱ्यांकडे आहे. ठाणेदार म्हणून नियुक्ती करताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महिला व पुरूष असा भेदभाव केला नाही. नागपूर पोलिस विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच चार महिला पोलिस अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये वाठोडा पोलिस ठाण्याचे नेतृत्व आशालता खापरे, मानकापूर पोलिस ठाण्यात वैजवंती मांडवधरे, बजाजनगर पोलिस ठाण्यात शुभांगी देशमुख आणि वाडी पोलिस ठाण्याचे नेतृत्व ललिता तोडासे यांच्याकडे देण्यात आले आहे. आशालता खापरे यांना शहरातील वाहतूक विभागाच्या पहिल्या महिला पोलिस इंचार्ज म्हणून मान मिळाला आहे. त्यांनी सक्करदरा वाहतूक विभागाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यामुळेच त्यांना वाठोडा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

राज्यात कुठे-किती महिला अधिकारी

पुणे शहरात ३२ पोलिस स्टेशन असून त्यापैकी ३ महिला पोलिस अधिकाऱ्यांना ठाणेदारी देण्यात आली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयात केवळ एका महिला अधिऱ्याला ठाणेदारी आहे तर औरंगाबाद आयुक्तालयात दोन महिला पोलिस अधिकारी ठाणेदार आहेत. नागपुरात चार महिला ठाणेदार आहेत. तसेच मुंबईमध्ये ९० पोलिस स्टेशन असून जवळपास डझनभर महिलांच्या हाती नेतृत्व देण्यात आले आहे.

अश्‍वती दोरजे पहिल्या सहआयुक्त

नागपूर पोलिसांच्या इतिहासात प्रथमच महिला पोलिस अधिकारी आयपीएस अश्‍वती दोरजे यांची नियुक्ती सहपोलिस आयुक्त पदावर करण्यात आली आहे. यापूर्वी अश्‍वती दोरजे यांनी नाशिक येथील पोलिस अधिकारी प्रशिक्षण केंद्राचेही प्रमुखपद यशस्वीरित्या सांभाळले आहे. उपराजधानीत सहआयुक्त या पदावर त्यांची नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी आहेत.

पोलिस खात्यात महिला किंवा पुरूष असा कोणताही भेदभाव नसतो. त्यामुळे मेरिट बेसवर ठाणेदारी दिल्या जाते. पोलिस अधिकाऱ्यांवर कोणतीही जबाबदारी दिल्यास ती योग्यपणे पार पाडू शकतात. त्यामुळेच महिला पोलिस अधिकाऱ्यांवर विश्‍वास दाखविण्यात आला आहे. आतापर्यंतच्या कालवधीत यशस्वीपणे ठाण्याचा कारभार महिला पोलिस अधिकाऱ्यांनी सांभाळून नियुक्ती सार्थ ठरविली आहे.

- अमितेश कुमार (पोलिस आयुक्त. नागपूर शहर पोलिस )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.