Bombay High Court : तेलगोटे कुटुंबीयांची फाशीची शिक्षा रद्द, वडील-मुलाला सुनावली जन्मठेप,आईची निर्दोष सुटका

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चऱ्हाटे हत्या प्रकरणातील तेलगोटे कुटुंबातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेत परावर्तीत केली आहे, तर एका महिलेची फाशी रद्द करून निर्दोष ठरवले आहे.
Bombay High Court
Bombay High CourtSakal
Updated on

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बहुचर्चित चऱ्हाटे हत्या प्रकरणातील तेलगोटे कुटुंबातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेत परावर्तीत केली आहे. तर, एका महिलेची फाशी रद्द करीत निर्दोष असल्याचा निकाल दिला आहे. या तीनही दोषींना अकोट न्यायालयाने १४ मे २०२४ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर अकोला जिल्ह्यातील मालमुरा (ता. तेल्हारा) येथील चऱ्हाटे कुटुंबियांतील चार सदस्यांची हत्या केल्याचा आरोप होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.