Hingna: सेतू कार्यालयाकडून सर्वसामान्यांची लूट, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मागितले जातायेत ५०० रुपये

नवीन रेशनकार्ड ऑनलाइन नोंदणीकरिता खासगी संगणक केंद्रावर चक्क पाचशे रुपये वसूल करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या हिंगणा परिसरात सुरू आहे.
Hingna: सेतू कार्यालयाकडून सर्वसामान्यांची लूट, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मागितले जातायेत ५०० रुपये
Updated on

SETU Office Tie Up With Private Computer Centre: नवीन रेशनकार्ड ऑनलाइन नोंदणीकरिता खासगी संगणक केंद्रावर चक्क पाचशे रुपये वसूल करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या हिंगणा परिसरात सुरू आहे. यातून लाभार्थ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे.

रेशन कॉर्डचा अर्ज भरून देण्यासाठी रेशनिंग विभाग ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सांगतो. त्यानंतर नोंदणीकृत सेतू केंद्रावर गेल्यावर अर्ज नोंदणी विषयी प्रशिक्षण किंवा परवानगी नाही, असे सांगून तिथे त्यांना खासगी संगणक केंद्रावर जाण्याचा सल्ला दिला जातो. काही खासगी केंद्राचे नाव दिले जाते.

तिथे गेल्यावर मात्र ही ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी चक्क पाचशे रुपये मागितले जातात. त्यामुळे ही तहसील कार्यालय सेतू ते खासगी संगणक केंद्र साखळी निर्माण करून नागरिकांची आर्थिक लूट तर केली जात नाही? हा प्रश्न निर्माण उपस्थित होत आहे. तालुक्यातील नोंदणीकृत सेतू असो किंवा खासगी संगणक केंद्र कुठेही कागदपत्रे तयार करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या पैशाची यादी नाही. शिवाय या सर्व केंद्राचे परस्पर लागेबांधे असून सर्व ठिकाणी मनमानी दराने पैसे वसूल करण्यात येत असल्याची ओरड नागरिकांची आहे. मात्र यावर कुणाचेही नियंत्रण नाही हे खरे आहे.(Latest Marathi News)

परवानगी नोंदणीकृत सेतुला नाही

नवीन रेशनकॉर्डकरिता अर्ज करण्यासाठी एक सोपे ॲप पुरवठा विभागाने तयार केली असून अँड्रॉइड मोबाईलवरून सुद्धा अर्ज करता येऊ शकतो,असे विभागाचे म्हणणे आहे. परंतु अजूनही ग्रामीण भागात सर्वांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे त्यांना अर्ज भरण्यासाठी संगणक केंद्रावर जावे लागते.याचाच फायदा घेऊन गोरगरिबांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेण्यात येत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही.

Hingna: सेतू कार्यालयाकडून सर्वसामान्यांची लूट, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मागितले जातायेत ५०० रुपये
Miandad and Dawood: "दाऊदचा व्याही होणं गर्वाची बाब कारण..."; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं खुलेआम केलं कौतुक

तक्रारी आल्यात तर कारवाई करू ः गायकवाड

शासनाने इ-शिधापत्रिका सुविधा ॲप काढले असून अर्जदाराने कुठे अर्ज भरावा, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. नोंदणीकृत सेतू अर्ज का भरत नाही, याबाबत माहिती नाही. खासगी केंद्रावर इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे घेत असतील तर नागरिकांनी तक्रारी कराव्यात, त्यावर वरिष्ठांशी बोलून कार्यवाही करू असे तालुका निरीक्षण अधिकारी रागिणी गायकवाड यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Hingna: सेतू कार्यालयाकडून सर्वसामान्यांची लूट, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मागितले जातायेत ५०० रुपये
ISRO Award : देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोला मिळाला 'एव्हिएशन वीक लॉरेट्स' पुरस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.