Bhimnagar Stone Pelting: घरांवरील दगडफेकीने भीमनगरात दहशत, पण दगडफेक करतय कोण? पोलिसांनी वर्तवला संशय

ईसासनी परिसरातील वॉर्ड क्रं.४ भीमनगर येथे तब्बल एक महिन्यांपासून सुरू असलेल्या गोटमारीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
hingna Bhimnagar Stone Pelting
hingna Bhimnagar Stone Pelting Esakal
Updated on

Hingna Bhimnagar Stone Pelting: ईसासनी परिसरातील वॉर्ड क्रं.४ भीमनगर येथे तब्बल एक महिन्यांपासून सुरू असलेल्या गोटमारीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

भीमनगर वॉर्ड क्रं.४ लता मंगेशकर दवाखान्याच्या भिंती लगत असलेल्या झोपड्यांवर गेल्या महिन्याभरापासून सकाळी ८ ते १० तर सायंकाळी ५ ते रात्री ११ सुमारास घरांवर दगडफेक होत आहे. अनेकांच्या घरांच्या छतावरील सिमेट सिटा फुटल्या असून घरातील सामानांची नासधूस झाली आहे. तसेच अनेकांना किरकोळ इजा झाल्याने गावात भितीचे वातावरण आहे. येथील नागरिक जीव मुठीत धरून आपल्या चिमुकल्यांसह मानसिक तणावात जीवन जगत आहे. परीक्षेच्या काळात या घटनेचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. या प्रकाराबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात नागरिकांनी दोन वेळा तक्रार नोंदविली. पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली.

पीडित नागरिकांनाच दमदाटी देऊन आरोपींना स्वत:च शोधून पकडण्याचा सल्ला दिला. पीडित नागरिकांमध्ये जयेंद्र श्रीरामे, रवींद्र चक्रपाणी, शैलेश डहाटकर, नाशिक लांजेवार, सिद्धार्थ साखरे, विकास पवार, टेभुर्णे, इंगोले आदींसह शेकडो नागरिकांचा समावेश आहे. या घटनेतील आरोपींना अटक करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा, व गोटमारीचे सत्र थांबविण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केल्या जात आहे.

ईसासनी भीमनगर परिसरात दहा ते बारा दिवसाअगोदर काही घरांवर दगडफेक होत असल्याची तक्रार आली होती. पोलिसांनी भीमनगर परिसराची पाहणी केली.परिसरातील नागरिकांची बैठक घेतली. नवीन रस्ते बांधकामासाठी मुरूम व दगड आणले आहे. तेच दगड मारलेले दिसले. परिसरातीलच काही लोक हा प्रकार करत असावे,असा संशय आहे.पोलिसही यावर नजर ठेवून आहेत. याबाबत काही तथ्य आढळल्यास पोलिस कारवाई करेल.-प्रवीण काळे (ठाणेदार), एमआयडीसी, हिंगणा

hingna Bhimnagar Stone Pelting
Shivsena UBT: पुरातत्व विभागाने केली उद्धव ठाकरेंची कोंडी! रात्री उशिरा दिली शिवनेरीवर हेलीकॉप्टर लॅन्डींगची परवानगी

ईसासनी भीमनगर परिसरात दगडफेक होत असल्याची माहिती मिळताच गावातील प्रथम नागरिक म्हणून घटनेची सत्यता तपासण्यासाठी परिसराची पाहणी केली. तसेच नागरिकांशी चर्चा केली. दगडफेक होत आहे, ही सत्य घटना आहे. मात्र हा प्रकार परिसरातीलच काही नागरिक करीत असल्याचा संशय आहे. यामुळे दगडफेक करणाऱ्यावरही नागरिक लक्ष देऊन आहेत. याबाबत सरपंच या नात्याने एमआयडीसी ठाणेदार प्रवीण काळे यांच्याशी चर्चा केली.त्यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. हा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.-अरविंद ढोणे, सरपंच, ग्रामपंचायत,ईसासनी

hingna Bhimnagar Stone Pelting
Kangana Ranaut: सुभाषचंद्र बोस देशाचे पंतप्रधान हवे होते! मोदी सूर्य अन् विरोधी नेते मेणबत्ती ; कंगना रणौत असं का म्हणाली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.