Nagpur Hit And Run: नागपूरमध्ये हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. एका ऑडी कारने तीन ते चार वाहनांना धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑडी कार ही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची आहे. गाडीचा चालक मद्य पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
सुषमा अंधारे म्हणाल्यात की, नागपूर हिट अँड रन प्रकरणात काही खुलासे मी काल केले होते. ऑडी कार ही चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याची होती. त्यानंतर संध्याकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑडी कार माझ्या मुलाची होती अशी कबुली दिली. पण बावनकुळे यांना माझे काही प्रश्न आहेत. चौकशी निष्पक्ष व्हावी असं जर बावनकुळे यांना वाटत होतं तर FIR मध्ये गाडीचा नंबर का आला नाही?