Nagpur : ८६८ गणेश मंडळांची अवैध वीज जोडणी

अशावेळी विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
nagpur news
nagpur news sakal
Updated on

नागपूर - गणेशोत्सवाची सर्वत्र धूम आहे. शहरात यंदा ९५० सार्वजनिक गणपतींची स्थापना आहे. मात्र, यातून केवळ ८२ गणेशमंडळांनी वीज जोडणीची परवानगी महावितरणकडे केली आहे. त्यामुळे इतर ८६८ गणेशमंडळांची अवैध वीज जोडणी असून वीज चोरी बरोबरच सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता महावितरणने वर्तविली आहे.

गणेशोत्सवात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात. त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मंडळांकडून रोषणाई केली जाते. अशावेळी विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महवितरणच्या अखत्यारीतील सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी वीजदर निश्चित केले आहेत. त्याची परवानगी घेण्याचे आवाहन महावितरणकडून सुद्धा करण्यात आले आहे. पोलिसांकडे आलेल्या परवानगीनुसार शहरात ९५० सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना होणार आहे. त्यात १८७ मोठे मंडळ आहेत.

nagpur news
Nagpur : आरटीओसोबत वाद घातल्यास तुरुंगवारी!
nagpur news
Nagpur News : मृत्यूला कवटाळताना प्रफुल्लने वाचवला तिघांचा जीव

असे असतानाही महावितरणच्या काँग्रेसनगर विभागात ४२, सिव्हिल लाइन्स १३, महाल १९, गांधीबाग ५ आणि बुट्टीबोरी ३ असे एकूण ८२ गणेश मंडळांनी वीज जोडणीची परवानगी घेतली आहे. त्यामुळे इतर मंडळे वीज जोडणीसाठी अवैध ठरत असल्याचा प्रकार महावितरण पुढे आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.