Nagpur Lemon Price: उन्हाचा तडाखा वाढताच लिंबाच्या दरात वाढ, टोमॅटो कोथिंबीर फुलकोबीचे भाव आवाक्यात

अद्रकाच्या पाठोपाठ आता लिंबाची होणारी आवक घटल्याने आणि उन्हाळ्याच्या तोंडावरच किरकोळ बाजारात एक लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहे.
Nagpur
Nagpur Esakal
Updated on

Increase in Lemon Price: अद्रकाच्या पाठोपाठ आता लिंबाची होणारी आवक घटल्याने आणि उन्हाळ्याच्या तोंडावरच किरकोळ बाजारात एक लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहे. ठोक बाजारात १०० लिंबासाठी ४०० ते ५०० रुपये द्यावे लागत आहे. लिंबाची दररोज दीड ते दोन हजार गोण्यांची आवक होत आहे.

पूर्वी ही आवक अडीच ते तीन हजार गोण्यांपर्यंत होती. पावसाने हजेरी लावल्याने भाजी पिकांना नवसंजिवनी मिळाली. स्थानिक नजिकच्या बाजारातूनच मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होत आहे. परिणामी, टोमॅटो, कोथिंबीर, आंबा, फुलकोबींची आवक वाढलेली आहे. या सर्वच भाज्यांच्या भावात प्रतिकिलो १० ते २० रुपयांची घसरण झालेली आहे.

सध्या संगमनेर, नाशिकसह स्थानिक बाजारातूनही टोमॅटोची आवक सुरू आहे. याशिवाय फुलकोबी, कोथिंबीरची स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक वाढलेली आहे. ही स्थिती काही दिवस राहणार आहे. पुढील महिन्याच्या १५ तारखेनंतर भाज्यांच्या दरात वाढ अपेक्षित आहे असे महात्मा फुले भाजी विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी राम महाजन यांनी सांगितले. (Latest marathi news)

भाज्यांचे प्रतिकिलो भाव (ठोक बाजार)

वांगी - २० रुपये

हिरवी मिरची - ३५ रुपये

कोथिंबीर - ३० रुपये

टोमॅटो - १५ रुपये

फुलकोबी - २० रुपये

पानकोबी - १५ रुपये

कारले - ४० रुपये

ढेमस - ५० रुपये

शिमला मिरची - ५० रुपये

वालाच्या शेंगा - ३० रुपये

चवळीच्या शेंगा - ३० रुपये

गवाराच्या शेंगा - ४० रुपये

कोहळे - १५ रुपये

दुधीभोपळा - १० रुपये

पालक - १२ रुपये

मेथी - ४० रुपये

आंबे - ६० रुपये

फणस - ४० रुपये

दोडके - ४० रुपये

Nagpur
Akola Lok Sabha 2024: अनुप धोत्रेंना मिळणार तगडी फाईट! प्रकाश आंबेडकरांची निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.