Nagpur : कुटुंबप्रमुखांच्या बचतीवर महागाईची कुऱ्हाड

मार्च एंडिंगमुळे सर्वच व्यापार थंडावले
inflation
inflation sakal
Updated on

नागपूर : वीज बिल, इंधन, जीवनावश्यक वस्तूंच्या दराचा आलेख सतत चढाच आहे. मार्च महिन्यामुळे शासकीय आणि खासगी कर्मचाऱ्यांनी प्राप्तिकराचा भरणा केलेला आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्‍यक वस्तुंची विक्री होत असून व्यापार ४० टक्‍क्‍यांनी माघारला आहे.

स्वयंपाकघरात सर्वात जास्ती आवश्यक असलेले जिरे ७० रुपयांनी तर खाद्य तेलाचे दर पाच रुपये प्रति किलोने वाढले आहेत. यातच पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरचे दरही ग्राहकांच्या आवाक्यात राहिलेले नाही. त्यामुळे कुटुंबप्रमुखांसह गृहिणींना नव्या खरेदीला ब्रेक मारावा लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

inflation
Nagpur : ब्लू लिफ बारमध्ये सापडली अल्पवयीन मुले हुक्का पिताना ११ जण ताब्यात

एक एप्रिलपासून अनेक सेवांचे दर, विमा हप्ता आणि इएमआय वाढल्याने सामान्यांवर भुर्दंड बसणे सुरू झाले आहे. त्यातच मार्चमध्ये धान्याची साठवणूक करण्याचे ठरवले आहे. पण पैशाची कमतरता आर्थिक नियोजनावर भारी पडत आहे. वाढलेल्या दरामुळे सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र आहे. यामुळे बचतीवर परिणाम झाला आहे.

  • चौकोनी कुटुंबाचे मासिक बजेट

  • मासिक किराणा (गॅस सिलिंडरसह) : ६५००

  • मोबाइल खर्च तिघांचा : ८००

  • केबल खर्च (सरासरी) : ५१०

  • घरभाडे-किंवा हप्ता : ६ ते १२ हजार (सरासरी ९ हजार)

  • शालेय शुल्क आणि इतर खर्च : ५ हजार

  • आजारपण-औषध : एक हजार

  • प्रवास खर्च पेट्रोल-रिक्षा (कमीत कमी) : ३०००

  • भाजीपाला : एक हजार रुपये

  • नॉनव्हेज किंवा फळे : १२०० रुपये

  • उपकरणे दुरुस्ती खर्च : ५०० रुपये

inflation
Nagpur News : निवृत्तीच्या दिवशी पदोन्नती!

घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान बंद आहे आणि दरही १ हजार १५४ रुपये आहे. एक किलो तेलासाठी १६० ते १९० रुपये लागतात. पेट्रोलचे दर शंभरीत पोचल्यामुळे मुलांचा खर्च वाढला आहे. डाळी महाग झाल्या आहेत. यामुळे कुटुंबाचे मासिक बजेट सुमारे दीड-दोन हजारांनी वाढले आहे. उत्पादन कमी झाल्याने गव्हाचे भाव वाढू लागले आहेत. भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. जीवनावश्‍यक इतर वस्तू महागल्यामुळे काटकसर करावी लागत आहे.

— संगिता ठाकरे, गृहिणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()