People Getting Insomniac Due to Over use of Phone: मेडिकलमधील मानसोपचार विभागात रोज सुमारे १०० ते १५० व्यक्ती मानसिक वैफल्यावर उपचारासाठी येतात. त्यापैकी ६ ते ९ व्यक्ती रात्री झोप येत नसल्याची तक्रार घेऊन येतात. या रुग्णांची खोलवर विचारणा केल्यास त्यांना मोबाइलवर रात्री उशिरापर्यंत समाजमाध्यमांवर रिल्स बघणे, वेब सिरीज बघणे, गेम खेळण्याचे व्यसन असल्याची माहिती मेडिकलच्या मानसोपचार विभागात झालेल्या पत्रपरिषदेत मानसोपचार सोसायटी नागपूर शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. मनीष ठाकरे यांनी दिली.
मानसोपचार सोसायटी नागपूर शाखेच्या (२०२४-२५) अध्यक्षपदी डॉ. मनीष ठाकरे तर सचिवपदी डॉ. सुधीर महाजन यांची निवड झाली आहे. डॉ ठाकरे म्हणाले, मोबाइलच्या व्यसनामुळे या व्यक्तीच्या स्वभावात बदल, चिडचिडेपणा, झोप न येणे, नैराश्यासह इतरही काही बदल जाणवतात. या व्यक्तीच्या एकाग्रतेवरही परिणाम होतो. त्यामुळे या व्यक्तीवर उपचार करताना त्याचे व्यसन कमी करण्यासाठी त्याचा मोबाइलचा वापर हळू- हळू कमी करावा लागतो. त्यासाठी प्रसंगी मनावर ताबा मिळवण्यासाठी काही मानसिक आजारांचे सौम्य औषधांचाही वापर करावा लागत असल्याचेही सांगितले.
उपराजधानीत मोबाइलचे व्यसन ही एक गंभीर समस्या होत चालली आहे. शहरातील विविध मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या एकूण शंभर रुग्णांपैकी सहा रुग्णांना मोबाइलचे व्यसन असल्याचे निरीक्षण मानसोपचार सोसायटी नागपूरने नोंदवले आहे, असे डॉ. सुधीर महाजन म्हणाले.(Latest Marathi News)
हल्ली मुलांच्या बहुतांश आवडी भ्रमनध्वनी वा टीव्हीवर बघून पुढे येतात. पालकांनी या आवडी बदलण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे, असे त्यातूनच मुलांना मोबाइलच्या व्यसनापासून वाचवणे शक्य आहे, असे डॉ. अभिजित बनसोड म्हणाले.
रविवारी पदग्रहण सोहळा
मानसोपचार सोसायटी नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मनीष ठाकरे तर सचिव डॉ. सुधीर महाजन यांच्यासह विविध पदांची जबाबदारी पार पाडणारे डॉ. प्रीती भुते, डॉ. आशिष कुथे, डॉ. निखिल पांडे, डॉ. अभिषेक मामर्डे, डॉ. श्रेयश मागिया, डॉ. मोसम फिरके, डॉ. रवी ढवळे, डॉ. श्रीकांत निंभोरकर, डॉ. प्रांजली वाघमारे, डॉ. मोनिषा दास, डॉ. कुमार कांबळे, डॉ. श्रीलक्ष्मी व्ही. यांचा पदग्रहण समारंभ १० मार्चला (रविवारी) नागपुरातील हॉटेल तुली इम्पीरियलमध्ये सकाळी १० वाजता होईल. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.