दहशतवाद्यांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात अलर्ट जारी, सीमांवर नाकेबंदी

terror
terrore sakal
Updated on

नागपूर : मुंबई आणि दिल्लीमध्ये दहशतवादी (terrorism in mumbai) पकडल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात अलर्ट (nagpur on aler mode) जारी करण्यात आला आहे. नागपूर पोलिसांना (nagpur police) सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील सर्व लॉज आणि हॉटेलमध्ये सर्च ऑपरेशन राबवित आहेत. शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीमांवर नाकेबंदी करण्यात आली असून प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे.

terror
२१ दिवसांचा संसार पाण्यात बुडाला, नवदाम्पत्याला एकाच सरणावर निरोप

दिल्ली पोलिसांनी १४ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास घातपाताच्या संशयावरून दहतशवादी मॉड्युल उधळून लावले. राजस्थान, उत्तरप्रदेश आणि दिल्लीतून एकूण सहा दहशतवाद्यांना अटक कऱण्यात आली. त्यामध्ये मुंबईतील जान मोहम्मद नावाचा एक दहशतवादी होता. महाराष्ट्र एटीएसकडून त्याच्या धारावीतील घराची झाडाझडती घेण्यात आली. तसेच त्याच्या पत्नीची कसून चौकशी केली. त्याला संपूर्ण मुंबईची खडा न् खडा माहिती असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच त्याचे दाऊदसोबत जुने संबंध असल्याचेही एटीएस प्रमुखांनी सांगितले होते. त्यानंतर महाराष्ट्र एटीएस पथक हे याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. तसेच जान मोहम्मद गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून तो बहरीनला एकाचा खून करण्यासाठी गेला होता, अशीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. त्यामुळे नागपुरात अलर्ट जारी करण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली जात आहे. लॉज आणि हॉटेलची चौकशी केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे, असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.