Nagpur : कानपुरी हातांनी वाढणार शीरखुर्म्याची लज्जत

ज्वाळांच्या सहवासात तयार होतात शेवया
राजन मूळचा कानपूर
राजन मूळचा कानपूरsakal
Updated on

नागपूर : मुस्लिम दिनदर्शिकेनुसार रमजान-उल मुबारकचा महिना. रमजानच्या महिन्यात खजुरापासून तर शीरखुर्मा असा लज्जतदार पदार्थांचा आनंद लुटण्याचा हा सण. मात्र शीरखुर्माची लज्जत वाढवणाऱ्या शेवया तयार करताना रखरखत्या उकाड्यात तप्त भट्टीसमोर कढईत तापलेल्या तेलातून शेवया काढाव्या लागतात.

या शेवया तयार करण्यासाठी पन्नासपेक्षा अधिक तरुणांचा मुक्काम नागपुरातील मोमिनपुऱ्यात असतो. शीरखुर्मा तयार करण्याचे काम केवळ मुस्लिम तरुण करीत नाही, तर सर्वधर्मीय तरुणांच्या मेहनतीतून नागपूरकरांना शीरखुर्म्याची लज्जतदार चव चाखायला मिळते. त्यातील हा पंचविशीतील तरुण राजन.

राजन मूळचा कानपूरचा. राजनने वयाच्या १४ वर्षांपासूनच शेवया तयार करण्याचे कसब आत्मसात केले. रमजान ईद निमित्त बनवल्या जाणाऱ्या स्वादिष्ट ‘शीरखुर्मा’मध्ये एक एक शेवई वेगळी होते. सुतासारख्या बारीक शेवया तयार करण्याचे वेगळेच तंत्र आहे.

तेलात पीठाच्या गोळ्यासारखा पदार्थ टाकल्यानंतर क्षणात शेवयाचा गुच्छ तयार झाल्याचे दिसते. कानपूरमध्ये मुस्लिम बांधवांच्या कार्यक्रमात शेवया तयार करण्यासाठी राजन पुढे असतो. रमजानच्या निमिताने राजनसह पन्नास ते साठ तरुणांसह अनेक वयस्क व्यक्तींनी पंधरा दिवसांपूर्वीच नागपूर गाठले.

भाड्याची घरे घेऊन मोमीनपुरा, भालदार पुरा परिसरात राहात आहेत. काही तरुणांशी महिनाभराचा करार करून त्यांना रोजंदारीवर येथे आणले जाते. रमजानच्या काळात मोठ्या प्रमाणात होणारी विक्री लक्षात घेता कंत्राटदार दिवसाला ८०० ते ९०० रुपये रोजंदारीवर ठेवतात. तर काही तरुण पोत्याप्रमाणे शेवया तयार करण्याचे कंत्राट घेतात.

राजन मूळचा कानपूर
Nagpur : लाच मागणाऱ्यांना चार दिवसांची कोठडी

या शेवयांच्या व्यवसायामुळे तरुणांच्या महिनाभराच्या कमाईत बरकत होते. बऱ्यापैकी कमाई करण्यासाठी नागपुरात येतात आणि रमजानचा पवित्र हेतू मनात ठेवून कानपूरला परत जातात.

राजन ही मेरी पहचान

त्याला नाव विचारले असता राजनही मेरी पहचान है, असे तो म्हणाला. हे सांगताना रमजानचा संदेशही त्याने नेमक्या शब्दा सांगितला. ‘पुण्य कमवा आणि पापाला जाळा.’ रमजानच्या महिन्यात दिवसा व रात्री मिळून नऊ वेळा नमाज अदा केली जाते.

राजन मूळचा कानपूर
Nagpur News : उच्च न्यायालयाच्या इमारतीचा होणार विस्तार

सलग तीस दिवस रोजा (उपवास) धरले जातात. हा रोजा १२ तासांचा असतो. सूर्योदयापासून अन्नपाणी वर्ज्य केले जाते. रमजान महिन्याचे पहिले १० दिवस ईश्वरी अल्लाच्या कृपेचे, पुढील १० दिवस भक्तीचे आणि शेवटचे १० दिवस रोजादाराच्या संरक्षणासाठी केले जात असल्याची माहिती त्याने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()