Nagpur: दिव्यांगांसाठी कोल्हारच्या कन्येचा मदतीचा हात

उद्‌वाहकासाठी दिली पावणेसात लाखांची देणगी; सेवाकार्यात खारीचा वाटा
nagpur news
nagpur newsesakal
Updated on

कोल्हार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत संचालित हरंगूळ बुद्रुक (जि. लातूर) येथील संवेदना प्रकल्पाच्या वर्धापनदिनानिमित्त वैशाली व प्रवीण शर्मा या दाम्पत्याने दिव्यांगांच्या सोयीकरिता उद्‌वाहकासाठी पावणेसात लाखांची देणगी दिली. या देणगीमुळे संस्थेला प्रोत्साहन मिळत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनकल्याण समितीचे प्रांत कार्यवाह तुकाराम नाईक होते. यावेळी प्रांताधिकारी शोभा जाधव, प्रांत संघटनमंत्री शरद खाडिलकर, प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, सचिव सुरेश पाटील, डॉ. जयराम खंडेलवाल, मंगला खंडेलवाल व प्रवीण शर्मा उपस्थित होते. वैशाली शर्मा या कोल्हारचे डॉ. जयराम खंडेलवाल यांच्या कन्या आहेत.

डॉ. खंडेलवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम व संघाशी संलग्न सेवा प्रकल्पांत स्वतःला झोकून दिले आहे. आता त्यांची पुढची पिढीही संघाच्या विविध प्रकल्पांसाठी मदत करीत आहे. डॉ. खंडेलवाल यांचे संस्कार त्यांची मुलगी वैशालीवरही झाले. त्यांची पुण्यात ‘नीरव बायोसोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी दहा वर्षांपासून कार्यरत आहे.

कंपनीतून मिळालेल्या सर्व फायद्याचा केवळ कुटुंबासाठी उपयोग करून चालणार नाही, समाजाचे आपण देणे लागतो, ही भावना शर्मा दाम्पत्याच्या मनात आहे. कंपनीमार्फत त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांसाठी योगदान दिले आहे. हरंगूळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित संवेदना प्रकल्प आहे.

तिथे दिव्यांगांसाठी आधार देण्याचे काम चालते. प्रकल्पाची इमारत बहुमजली आहे. तिच्यात वावरताना दिव्यांगांची अडचण व्हायची. त्यावरचा उपाय म्हणून वैशाली यांनी इमारतीत उद्‌वाहकासाठी सहा लाख ६५ हजार रुपये मदत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.