Loksabha Election: निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर या मैदानांवर खिळणार नेत्यांच्या नजरा, अद्याप एकाही पक्षाचं बुकिंग नाही

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. अनेकांच्या नजरा अमरावती मतदारसंघावर लागल्याने या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Nagpur Loksabha
Nagpur Loksabha Esakal
Updated on

Ground Booking For Political Rallies: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. अनेकांच्या नजरा अमरावती मतदारसंघावर लागल्याने या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या काळात शहरातील मोजक्या मैदानांवर राजकीय पक्षांच्या नजरा खिळल्या आहेत. अद्यापपर्यंत एकाही मैदानाचे बुकिंग झाले नसले तरी येत्या काही दिवसांत उमेदवार जाहीर झाल्यानंतर खऱ्या अथाने सभांचा धडाका सुरू होणार आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उतरविण्याचा दावा केला असला तरी अद्याप एकाही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. शहरातील सर्वांत मोठ्या मैदानांमध्ये समावेश असलेले सायन्सकोर मैदान हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे असून त्याचे आरक्षण शिक्षण विभाग तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहमतीनेच केले जाऊ शकते. या मैदानाचा काही भागच सभेसाठी दिला जात असल्याने त्याची क्षमता पूर्वीपेक्षा कमी झाली आहे.

राजकमल चौकातील नेहरू मैदान हे शहराच्या हृदयस्थळी असणारे दुसरे सभेचे ठिकाण असून दसरा मैदानावर सुद्धा सभेचे नियोजन करता येते. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत या तीन मैदानांवरच सर्वांच्या नजरा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा सायन्सकोरवरच गाजल्या आहेत.(Latest Marathi news)

विशेष म्हणजे, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा सायन्सकोरवरच हाउसफुल्ल होत होत्या. या मैदानाची क्षमता अधिक असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांना गर्दी जमविण्यासाठी येथे फार कष्ट उपसावे लागतात, दुसरीकडे नेहरू मदान व दसरा मैदानावर तेवढे श्रम करावे लागत नाहीत.

Nagpur Loksabha
Samsung Upcoming Smartphone : मार्चच्या अखेरपर्यंत Samsung Galaxy M35 5G हा नवा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता, जाणून घ्या फिचर्स

व्यावसायिकांना अच्छे दिन

निवडणुकीच्या निमित्ताने पोस्टर, बॅनर्स, झेंडे, दुपट्टे तयार करणाऱ्या व्यावसायिकांना चांगले दिवस येणार आहेत. जसजसा निवडणुकीचा पारा चढत जाईल तसतशी व्यावसायिक उलाढालसुद्धा वाढणार असल्याने व्यावसायिकांना यानिमित्ताने अच्छे दिन येणार आहेत. अनेकांनी झेंडे. पताका, टी-शर्टची आगाऊ नोंदणी मुंबई, पुण्यातील पुरवठाधारकांकडे केली आहे. (Latest Marathi news)

Nagpur Loksabha
Sanjay Raut: "आमच्या हातात ED-CBI येईल तेव्हा भाजप शिल्लक नसेल"; राऊतांचा फडणवीसांना इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.