Political Campaigning on Social Media: लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आली असून इच्छुक उमेदवारांकडून प्रचार सुरू करण्यात आला आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे. नियमानुसार प्रचार करण्यासाठी उमेदवारास निवडणूक विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु एकाही उमेदवाराने परवानगीसाठी अर्जच केला नाही.
१६ मार्चापासून लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. अद्याप अनेक काही पक्षांकडून उमेदवार निश्चित होणे बाकी होणे आहे. दुसरीकडे नागपूर व रामटेक लोकसभेसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. नागपुरातून कॉंग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपकडूनही मंत्री नितीन गडकरी यांचे नाव आधीच अंतिम करण्यात आले आहे.
शिवसेनेकडून राजू पारवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोघेही २७ मार्चला अर्ज दाखल करणार आहेत. परंतु काही उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून काहींनी प्रचार सुरू केला आहे. नियमानुसार परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत एकाही उमेदवाराकडून परवानगीसाठी अर्ज केला नसल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)
जाहिरात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. याप्रचारासाठी दरही निश्चित करण्यात आले आहे. परंतु अद्याप एकाही उमेदवाराकडून बल्क एसएमएस किंवा ऑडिओ रॅकॉर्डिंगच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी परवानगी मागण्यात आली नाही.- विनोद रापतवार, सदस्य सचिव, एमसीएमसी, नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.