Loksabha: निवडणुकीच्या रिंगणातून माघार कोण घेणार?गजभिये, साखरेंच्या बंडखोरीकडे लक्ष; आज उमेदवारी मागे घेण्याचा दिवस

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी तीन डझन उमेदवारांनी दावेदारी दाखल केली आहे. शनिवारी (ता.३०) उमेदवारी मागे घेण्याचा दिवस असल्याने निवडणुकीच्या रिंगणातून किती बंडखोर माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 esakal
Updated on

Loksabha Election 2024: नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी तीन डझन उमेदवारांनी दावेदारी दाखल केली आहे. शनिवारी (ता.३०) उमेदवारी मागे घेण्याचा दिवस असल्याने निवडणुकीच्या रिंगणातून किती बंडखोर माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकूण ३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संघटक सुरेश साखरे या प्रमुख बंडखोरांचा समावेश आहे. किशोर गजभिये हे सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. मात्र वंचितने शंकर चहांदे यांच्या नावाला पसंती दिली. चहांदे हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, समाज कल्याण सभापती तसेच कामठी नगरपरिषदेचे ते नगराध्यक्ष होते. त्यांच्या बंडखोरीने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वंचितने अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर केल्याने ते माघार घेण्याची शक्यता नाही. किशोर गजभिये माघार घेणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते नरेश बर्वे यांनीही दावेदारी दाखल केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांचे ते नातेवाईक आहेत. काँग्रेसच्या दर्शनी धवड यांनीसुद्धा बंडखोरी केली आहे. त्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत.

नागपूर मतदारसंघातून ५३ उमेदवारांनी दावेदारी दाखल केली होती. यापैकी २७ जणांचे अर्ज छाननीत बाद झाले. त्यामुळे आता २६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. भाजपचे हेविवेट नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसतर्फे पश्चिम नागपूरचे आमदार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे रिंगणात आहे. नागपूरमध्ये एकाही बड्या पक्षाच्या नेत्याने बंडखोरी केली नाही. वंचित बहुजन विकास आघाडीने येथे उमेदवारच दिला नाही. त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. बसपाने आपल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election 2024
Shreyas Iyer Video: 'मी गोंधळलोय, मला दोन प्लेइंग इलेव्हनच्या शीट दिल्या...', टॉसवेळी KKR कॅप्टनचा सावळा गोंधळ

अनेक नेते रामटेकच्या बाहेर

रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीने काँग्रेसचा उमेदवार आयात केल्याने भाजपचे अनेक इच्छुक उमेदवार नाराज आहेत. पाच वर्षे भाजपकरिता काम करायचे आणि निवडणुकीत दुसऱ्यासाठी मतदान मागायचे हे न पटल्याने अनेकांनी रामटेकमधून अंग काढून घेतले असल्याचे समजते.

महायुतीमध्ये रामटेक मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला आहे. सुमारे पंचेवीस वर्षांपासून हा मतदारसंघ सेनेकडेच आहे. यावेळी तो मिळवण्याची संधी भाजपला होती. भाजपच्या नेत्यांनीही शेवटपर्यंत प्रयत्न केला होता. येथील वाटाघाटी आणि हालचाली बघून भाजपच्या अनेक इच्छुकांच्या निवडणूक लढण्याच्या इच्छा जागृत झाल्या होत्या. अनेकांनी नेत्यांमार्फत फिल्डिंग लावली होती. काहींनी अप्रत्यपणे भेटीगाठींचे सत्र सुरू करून प्रचाराला सुरुवात केली होती. उमरेड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना भाजपमध्ये आणण्याचा हालचाली आधीपासूनच सुरू होत्या. यास भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते

Lok Sabha Election 2024
Ambadas Danve : ''मी निष्ठावान शिवसैनिक, कुठेही जाणार नाही'' अंबादास दानवेंनी स्पष्ट केली भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()