Nagpur Loksabha: गडकरी - ठाकरे यांच्यात थेट लढत, नागपूरच्या रिंगणात २६ उमेदवार; एकाही उमेदवाराने घेतली नाही माघार

नागपूर लोकसभा मतदारसंघातील एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत.
Nagpur news
Nagpur news Esakal
Updated on

Nagpur Loksabha Election: नागपूर लोकसभा मतदारसंघातील एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. वंचित बहुजन विकास आघाडी, एमआयएमने यावेळी उमेदवार उभे केले नाहीत तर दुसरीकडे एकाही मोठ्या नेत्याने बंडखोरी केली नसल्याने येथे भाजपचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होणार आहे.

नागपूरमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीने उमेदवारच उभा केला नाही. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीच वंचितच्या उमेदवाराने सुमारे २६ हजार मते घेतली होती. वंचितच्या उमेदवाराचे प्रचाराचे साहित्य भाजपच्या कार्यालयातून जात होते, असा आरोप आहे. वंचितच्या माध्यमातून भाजपने ‘डमी‘ उमेदवार उभा केल्याचे बोलल्या जात होते.

बहुजन समाज पार्टी लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करीत होती. याशिवाय खुल्या मतदारसंघातून अनुसूचित जातीच्या उमेदवाराला उमेदवारी दिली जात नव्हती. यावेळी बसपाने सर्व समज-गैरसमज खोटे ठरवले. यावेळी योगेश लांजेवार बसपाचे उमेदवार आहेत. त्यांच्या पत्नी बसपाच्या माजी नगरसेविका आहेत. बसपाच्या उमेदवाराने मागील निवडणुकीत सुमारे ३० हजार मते घेतली होती.

दोन डझन उमेदवार

देश जनहित पार्टी, अखिल भारतीय परिवार पार्टी, भारतीय जवान किसान पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन महा पार्टी, सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट, माइनोरिटिज डेमोक्रेटिक पार्टी, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, भीम सेना, राष्ट्र समर्पण पार्टी, कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी, ऑल इंडिया फॅारवर्ड ब्लॅाक या सारख्या फारसे अस्तित्व नसेलल्या पक्षांसह सुमारे दोन डझन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Nagpur news
Mosque for Transgender Community: 'या' देशात तृतीयपंथी समुदायासाठी उघडली पहिली मशीद

बसपाचा अपवाद वगळता एकाही पक्षाचे शहरात अस्तित्व नाही. अपक्ष उमेदवारांमध्ये जनाधार असलेला कोणीच नाही. हे बघता नागपूरमध्ये यावेळी मतविभाजनाचा काँग्रेसला धोका नसून नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी थेट लढत होणार असल्याचे दिसून येते.

Nagpur news
Sai Lokur: "अतिशय लाजिरवाणी गोष्ट"; वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना सई लोकूरचं सडेतोड उत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.