Nagpur Madgaon Special Train: नागपूर-मडगाव विशेष रेल्वेला मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत धावणार ट्रेन

विदर्भ आणि कोकण या दोन विभागांना जोडणारी नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी ३० मार्चऐवजी ८ जूनपर्यंत धावणार आहे.
Nagpur Train
Nagpur TrainEsakal
Updated on

Nagpur Madgaon Special Train: विदर्भ आणि कोकण या दोन विभागांना जोडणारी नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी ३० मार्चऐवजी ८ जूनपर्यंत धावणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव आणि गाडी क्रमांक ०११४० मडगाव-नागपूर रेल्वेगाडीची सेवा वाढवण्यात येत आहे. प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली रेल्वेगाडी कायमस्वरूपी वेळापत्रकाद्वारे न चालवता, दर दोन ते तीन महिन्यांची सेवा वाढवून ही गाडी कोकण आणि मध्य रेल्वेकडून विशेष तिकीट दरासह चालवण्यात येत आहे.

कोकण आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या मागणीचे कारण देत, गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा या गाडीच्या सेवेत वाढ झाली आहे. तसेच, ३० डिसेंबर २०२३ ते ३० मार्च २०२४ पर्यंत नागपूर-मडगाव आणि ३१ मार्च २०२४ पर्यंत मडगाव-नागपूर या रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ करण्यात आली होती.

आता पुन्हा नागपूर-मडगाव गाडीची सेवा ८ जूनपर्यंत आणि मडगाव-नागपूर गाडीची सेवा ९ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद असून ती नागपूर ते मडगांव या पट्ट्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडते. मात्र रेल्वे प्रशासन यास कायमस्वरूपी वेळापत्रकानुसार का चालवत नाही, असा प्रश्न प्रवाशांनी केला आहे.

Nagpur Train
Sunetra Pawar: बारामतीत नणंद विरुद्ध भावजय सामना रंगणार! अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.