नागपूर : जिल्ह्यातील शक्तीपीठ कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्यावतीने लवकरच अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. येथील १६४ खोल्यांच्या भक्तनिवासात श्री महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्स अँड मल्टीऑर्गन ट्रान्सप्लॉंट हॉस्पिटल उभारले जाणार आहे.
इस्पितळासाठी इमारत हस्तांतरण सोहळा मंगळवारी पार पडला. यामाध्यमातून मध्यभारतात प्रथमच ऑर्गन ट्रान्सप्लॉंटची सुविधा उपलब्ध होणार असून त्याचा लाभ जनतेला होणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात दिवाळीच्या शुभमुहुर्तावर मंगळवारी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी व मंदिर संस्थानचे अध्यक्ष बावनकुळे यांनी याबाबतचा हस्तांतर करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी अप्पर आयुक्त अविनाश कातडे, अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर, कार्यकारी अभियंता कल्पना इखार, सहाय्यक अभियंता नेपाल भाजीपाले व वास्तूविशारद नीशिकांत भिवगडे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र टोकेकर उपस्थित होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, नागपूर मध्यभारतातील हेल्थकेअर हबकडे वाटचाल करीत आहे. तथापि, येथे ऑर्गन ट्रान्सप्लॉंटसाठी सुविधा नसल्याने रुग्णांना हैदराबाद, मुंबई व चेन्नईकडे जावे लागते.
यात मोठा खर्च होत असल्याने हा उपचार अत्याधिक खार्चिक होता. त्यामुळे नागपूर येथे ऑर्गन ट्रान्सप्लॉंट सुविधा निर्माण व्हावी, अशी मागणी केली जात होती. नागपूर नजीकच्या कोराडी येथे ऑर्गन ट्रान्सप्लॉंट सुविधा निर्माण करण्याची कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनातून स्वीकारली. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या हॉस्पिटलच्या परवानगीसाठी विशेष प्रयत्न केले. कोराडी संस्थानचे भक्तनिवास यासाठी देण्यात यावे, अशी मागणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडे केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला व आता भक्तनिवासाचे रुपांतर श्री महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्स अँड मल्टिऑर्गन ट्रान्सप्लॉंट हॉस्पिटलमध्ये होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.