Loksabha Election : भाजपात आणखी नवे चेहरे येणार? पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, पराभूत जागांवर राहणार 'फोकस'

महाराष्ट्रातील ४५ आणि विधानसभेच्या २२५ जागा जिंकण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपने मागील निवडणुकीत पराभव झालेल्या जागांवर फोकस करण्याचा निर्णय घेतला आहे.
Loksabha Election : भाजपात आणखी नवे चेहरे येणार? पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, पराभूत जागांवर राहणार 'फोकस'
Updated on

BJP New Faces in Loksabha Election: महाराष्ट्रातील ४५ आणि विधानसभेच्या २२५ जागा जिंकण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपने मागील निवडणुकीत पराभव झालेल्या जागांवर फोकस करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता भाजपात आणखी इतर पक्षातील नेत्यांचे आगमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवीरी कोराडी येथील नैवद्यम सभागृहात घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच प्रदेशांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. मागील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला फक्त १०५ जागाच जिंकता आल्या होत्या.

दीडशेची अपेक्षा असतानाही काही महत्त्वाच्या जागा भाजपने गमावल्या. त्या परत खेचून घेण्यासाठी निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणुकीपूर्वी विविध पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांना भाजपात सामील करून घेतले जाणार आहे. काँग्रेसच नव्हे तर शिवसेना व राष्ट्रवादीच्याही काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेण्यात येणार आहे.(Latest Marathi News)


बैठकीत भाजपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचा संघर्ष आणि सत्तेपर्यंतची वाटचाल याविषयी माहिती दिली. आमदार आशिष शेलार यांनी प्रास्ताविकात मुंबईतील राजकीय परिस्थिती सांगितली. राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सुमारे ६५० पदाधिकारी विविध जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. ६०० सुपर वॉरियर्स तयार करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

Loksabha Election : भाजपात आणखी नवे चेहरे येणार? पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, पराभूत जागांवर राहणार 'फोकस'
Sakal Podcast : संसदेबाहेर आत्मदहनाचा होता प्लॅन, आरोपी सागरचा खुलासा ते रामलल्लाच्या अयोध्येत जल मेट्रोही येणार

४२ मतदारसंघांवर अधिक लक्ष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी झाल्याने जागवाटपात अडचणी येऊ शकतात. हे लक्षात घेऊन ज्याची जिंकण्याची क्षमता जास्त त्याला उमेदवारी देण्याचे ठरवण्यात आले. ४२ मतदारसंघात भाजप मागील निवडणुकीत पराभूत झाली होती. त्यावर सर्वाधिक अधिक लक्ष देण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

Loksabha Election : भाजपात आणखी नवे चेहरे येणार? पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, पराभूत जागांवर राहणार 'फोकस'
Maharashtra Cold : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.