MIHAN Project: 'मिहानमध्ये येत्या तीन वर्षांत १ लाख युवकांना रोजगार', नितीन गडकरी यांचं महत्वाचं विधान

नागपुर शहरातील रिंग रोडवर ट्रॉली बस धावणार आहे. तीन बस मिळून ही ट्रॉली बस असणार आहे.
MIHAN Project: 'मिहानमध्ये येत्या तीन वर्षांत १ लाख युवकांना रोजगार', नितीन गडकरी यांचं महत्वाचं विधान
Updated on

Nitin Gadkari on MIHAN: शहरातील रिंग रोडवर ट्रॉली बस धावणार आहे. तीन बस मिळून ही ट्रॉली बस असणार आहे. यासाठी राज्य शासनाने सव्वाशे कोटी रुपयांना मंजुरी दिली असल्याचे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सांगितले.
पूर्व नागपुरातील ५ नव्या उड्डाणपुलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संत गोरा कुंभार चौक, के.डी.के.कॉलेज, नंदनवन येथे पार पडला.

याप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल, खासदार कृपाल तुमाने, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर कार्यक्रमाला उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, ट्रॉली बस रिंग रोडवर धावणार आहे. तीन बस मिळून ही ट्रॉली बस असणार असून यासाठी राज्य शासनाने सव्वाशे कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. त्याच प्रमाणे मिहानमध्येही इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येईल. गेल्या दहा वर्षांत मिहानमध्ये एक लाख युवकांना रोजगार मिळाला आहे.(Latest Marathi News)

येत्या तीन वर्षात आणखी एक लाख युवकांना रोजगार देण्याचे लक्ष्य आहे. गीता मंदिर जवळ टेक्सटाईल मार्केट तयार करण्यात येणार आहे. जुना भंडारा रोडचे विस्तारीकरण होणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची कारवाई सुरू करण्यात आली. येथील दुकानदारांना कळमना येथे मोठी जागा देण्यात आल्याने इतवारी व गांधीबाग येथील वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचे ते म्हणाले.

MIHAN Project: 'मिहानमध्ये येत्या तीन वर्षांत १ लाख युवकांना रोजगार', नितीन गडकरी यांचं महत्वाचं विधान
Nagar-Kalyan Highway Accident : नगर-कल्याण हायवेवर ट्रकने दोन वाहनांना उडवलं; अपघातात एकाच कुंटुंबातील चौघांसह ८ जण जागीच ठार

उड्डाणपुलाच्या चौकात अपघात होता कामा नये यासाठी ‘अंडरपास’ तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्यात. या पुलामुळे कुणाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मोमिनपुरा ते कामठीपर्यंतही मोठा उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. कचऱ्यापासून सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. पाण्याच्या नवीन टाक्या तयार करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात ८५ टक्के नागरिकांना २४ बाय ७ पिण्याचे पाणी मिळेल, असेही ते म्हणाले.

खासगी जागेवरील झोपडीधारकांनाही मालकी पट्टे: फडणवीस
खासगी जागेवरील झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे फायदा अनेक झोपडीधारकांना दिला होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या खासगी जमीन मालकांनी टीडीआर देण्यात येणार आहे. गेल्या दीड वर्षात शहरात पाच हजार कोटींची कामे मंजूर झालीत. यातील बरीचशी कामे प्रगतिपथावर आहेत. महारेलचे काम जलद आणि दर्जेदार आहे. या कंपनीची सुरवात आपण केल्याची माहितीही त्यांनी दिली. (Latest Marathi News)

MIHAN Project: 'मिहानमध्ये येत्या तीन वर्षांत १ लाख युवकांना रोजगार', नितीन गडकरी यांचं महत्वाचं विधान
Sujay Vikhe: खासदार विखेंचा ताफा अडवला! मराठा आरक्षणासाठी तरुण आक्रमक, ठाकूर निमगावातील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()