Nagpur Food Poisoning: महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी खाल्लं शिंगाड्याचं पीठ अन् अचानक...शंभरावर नागरिकांना विषबाधा

नागपूर शहरातील विविध भाग व कामठीत महाशिवरात्रीचा उपवास सोडल्यानंतर नागरिकांची अचानक प्रकृती बिघडल्याने मेडिकल, मेयो, विम्स तसेच शांतीमोहन रुग्णालयात सव्वाशेवर रुग्ण हगवण, उल्टी आणि पोटदुखीने दाखल झाले.
Nagpur
NagpurEsakal
Updated on

Nagpur Mahashivratri Food Poisoning Case: नागपूर शहरातील विविध भाग व कामठीत महाशिवरात्रीचा उपवास सोडल्यानंतर नागरिकांची अचानक प्रकृती बिघडल्याने मेडिकल, मेयो, विम्स तसेच शांतीमोहन रुग्णालयात सव्वाशेवर रुग्ण हगवण, उल्टी आणि पोटदुखीने दाखल झाले. यामुळे खळबळ उडाली यापैकी कुणी घरीच साहित्य आणून पदार्थ तयार केले तर काहींनी विकत आणल्याचे सांगितले. अनेकांनी सिंगाड्याचे पीठ, शेव, भगरीचे पदार्थ खाल्ले होते. पण विषबाधेचे नेमके कारण कळू शकले नाही. (Latest Marathi news)

अन्न व औषध विभागाकडून विविध भागातील विक्रेत्यांकडून नमुने घेण्यात येत आहेत. उपवासात शिंगाड्याचे पीठ, भगरीचे पदार्थ खातात. उपवास सोडल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री मेडिकलमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण उलटी, हगवण आणि पोटदुखीचा त्रास घेऊन आले. उपचारानंतर चार तासाने त्यांची प्रकृती स्थिर झाली. असेच १२ तासांमध्ये १२५ वर रुग्ण आले.

रात्री दहानंतर रुग्ण वाढले

शुक्रवारी रात्री दहा नंतर तर शनिवारी सकाळी ९ वाजेपासून शहरात असे विषबाधा झालेले रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले. मोहननगर आणि खलाशी लाईनसह इतरही वस्त्यांमधील सुमारे ३५ जणांना मेयोत दाखल करण्यात आले. यात अनकांचे पूर्ण कुटुंब होते. जयंत टेंभुर्णे, राम कुकडे हे सामाजिक कार्यकर्ते रुग्णांना दाखल दाखल करण्यासाठी धावपळ करीत होते. ४० रुग्णांना मेयोत आणले. (Latest Marathi news)

दुपारनंतर अर्ध्याहून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले. सायंकाळी १५ रुग्णांना वॉर्डातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले. पीडितांनी बाहेरचा फराळाचा प्रसाद किंवा घरचे जेवण खाल्ल्याचे कारण सांगितले. महापालिकेचे पथकही कामाला लागले असून नातेवाईकांकडून खाण्यापिण्याच्या वस्तूंची विचारपूस करण्यापलीकडे काही करू शकले नाही. दरम्यान मुदतबाह्य पदार्थ असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती पुढे आली.

Nagpur
Election Commission: 3 वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना राजीनामा; अरुण गोयल यांच्याबाबत जाणून घ्या 5 गोष्टी

हिंगणा, कामठीसह ९ भागात विषबाधा

भगर, सेव, सिंगाड्याचे पीठ आणि उपवासाची भाजणी यातून विषबाधा झाल्याच्या माहितीला नातेवाइकांनी दुजोरा दिला आहे. मात्र सायंकाळपर्यंत महापालिकेचा संसर्गजन्य रोग विभाग असो की, अन्न व औषध प्रशासन विभाग यांना माहिती नसल्याचे संवादातून पुढे आले. शहरातील मोहननगर, खलाशी लाईन, फुटाळा तलावाभोवतालच्या वसाहती, त्रिमूर्तीनगर, खामला, बिनाकी मंगळवारी, विनोबा भावेनगर, तांडापेठ आदी भागांसह हिंगणा, कामठीमधील सुमारे सव्वाशेवर नागरिकांना विषबाधा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान गर्भवती मातेचाही यात समावेश होता.

मेयो - ३५ (Latest Marathi news)

मेडिकल - ५

विविध खासगी रुग्णालय - ३६

कामठी,हिंगणा विविध रुग्णालय -५०

Nagpur
Arun Goel Resign: अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा का दिला? पुढे काय होणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.