Nagpur Mango Price Hike: उन्हाळ्याची चाहूल लागतात सर्वांना आंबा खाण्याचे वेध लागतात. आंबा स्वस्त असला की ते खाण्याचे प्रमाणही आपोआपच वाढते. पण यंदा अवकाळीने आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी आंब्याचा गोडवा यंदा नागरिकांचा खिसा मात्र कडवट करणार असल्याचे दिसते.
विदर्भात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेशातून येणाऱ्या आंब्यांची आवकही कळमना फळ बाजारात घटलेली आहे. सध्या रोज बैंगनपल्ली आंब्याच्या दीड ते २ हजार क्रेट विक्रीसाठी येत आहे. गुणवत्तेनुसार भाव प्रतिकिलो ६० ते १०० रुपयांपर्यंत आहेत. सध्या केवळ बैंगनपल्ली आंब्याची आवक आहे.
आंध्रप्रदेशात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाअभावी आंब्याचे उत्पादन २० ते २५ टक्के कमी राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून सुरू झालेली आवक मेपर्यंत राहील. कळमन्यात भाव ६० ते १०० रुपये किलो असून किरकोळ बाजारात १०० ते १५० रुपये किलोने आंबा विकल्या जात आहे. (Latest Marathi News)
बैंगनपल्ली आंबा कळमन्यातून मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात विक्रीसाठी पाठवला जातोय. सध्या फक्त आंध्रप्रदेशचा बैंगनपल्ली कळमन्यात विक्रीसाठी आला आहे. आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील. विदर्भात नागपूर, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, भंडारा, गोंदिया या भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळाला. त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.
विदर्भात आंध्रप्रदेशच्या बैंगनपल्ली आंब्याची सर्वाधिक आवक आहे. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याची आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील. विदर्भासह अनेक राज्यांत गारपिटीमुळे आंब्याचा मोहर गळाला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमीच आहे. भाव वाढण्याची शक्यता आहे.- आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फ्रूट अडतिया असोसिएशन. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.