Nagpur Drugs in Pub:‘पब’ की ‘एमडी’विक्रीचा अड्डा !गेल्यावर्षी दुप्पट गुन्ह्यांची नोंद, नाइट कल्चरमुळे वाढली व्यसनाधीनता

नागपुरात शहरात वाढती ‘पब’ संस्कृती आणि ‘एमडी’ ची विक्री नव्या सांस्कृतिक संकटाला निमंत्रण देत आहे. एनडीपीएस कायद्यानुसार राज्यात देशातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
Nagpur Drugs in Pub:‘पब’ की ‘एमडी’विक्रीचा अड्डा !गेल्यावर्षी दुप्पट गुन्ह्यांची नोंद, नाइट कल्चरमुळे वाढली व्यसनाधीनता
Updated on

Nagpur MD Drugs Selling in Pub: राज्यातील तरुणाईमध्ये नशेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यात नशायुक्त पदार्थांचा बाजार चांगलाच फोफावला आहे. शहरात वाढती ‘पब’ संस्कृती आणि ‘एमडी’ ची विक्री नव्या सांस्कृतिक संकटाला निमंत्रण देत आहे. एनडीपीएस कायद्यानुसार राज्यात देशातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

त्यात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे एनसीआरबी अहवालातून समोर आले असताना, गेल्या वर्षी या गुन्ह्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. एकंदरित ही आकडेवारी काळजी वाढवणारी आहे.

तरुणाईत वाढलेली व्यसनाधीनता ही अंमली पदार्थाच्या विक्रीचे सर्वात मोठे कारण आहे. त्यातून शहरात मोठ्या प्रमाणात गांजा, चरस, ब्राऊनशुगर, एमडी ड्रग्जची विक्री केल्या जाते. महाविद्यालयीन तरुणांना हेरून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ही विक्री केल्या जाते. शहरात गेल्या वर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबरदरम्यान ४२३ प्रकरणांमध्ये ५५८ आरोपींना अटक करून ४ कोटी ७४ लाख ३९ हजार १९१ रुपये किमतीचा मुद्देमाल एनडीपीएसच्या पथकाने जप्त केला. (Latest Marathi News)

त्यामुळे या दोन्ही अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
शहरात नाइट कल्चरला अधिक पसंती दिल्या जात असल्याने पब, नाइट क्लब आणि बारमध्ये रात्रभर तरुणाई थिरकताना दिसते. शहरात पबची संख्याही वाढली असून त्यात जाणाऱ्यांमध्ये उच्चभ्रू गटातील युवक युवतीच्या समावेश अधिक आहे.

Nagpur Drugs in Pub:‘पब’ की ‘एमडी’विक्रीचा अड्डा !गेल्यावर्षी दुप्पट गुन्ह्यांची नोंद, नाइट कल्चरमुळे वाढली व्यसनाधीनता
Latest Marathi News : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

एमडी ची सर्वाधिक चलती
नागपुरात साधारणतः मुंबईतून एमडी ड्रग्ज आणि ओडिशातून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती आहे. पेडलरच्या माध्यमातून हे ड्रग्ज आणण्यासाठी खासगी वाहनाचा उपयोग होतो. याशिवाय रेल्वेतून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होते. एमडी ड्रग्ज साधारणतः ३ हजार रुपये ग्रॅमपासून सुरू होत असल्याने त्याची नशा करणारे व्यापारी आणि उच्चभ्रू घरातील तरुण असतात. शिवाय गांजा अगदी शंभर रुपयात मिळत असल्याने महाविद्यालयीन तरुणांमध्ये त्याचे सेवन करण्याचे प्रमाण अधिक आहे. (Latest Marathi News)

तस्करी रोखण्याचे आव्हान
येत्या काळात एमडीसह गांज्याची तस्करी रोखणे हे नागपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. सातत्याने वाढत असलेले गुन्हे आणि तस्करीचे प्रमाण चिंताजनक आहे.

अशी आहे आकडेवारी
वर्ष गुन्हे अटकेतील आरोपी जप्त मुद्देमाल
२०२१ ३३८ ४४१ २,६३,५४,०१८
२०२२ २७९ ३९९ ४,१३,८७,३११
२०२३ ४२३ ५५८ ४,७४,३९,१९१

Nagpur Drugs in Pub:‘पब’ की ‘एमडी’विक्रीचा अड्डा !गेल्यावर्षी दुप्पट गुन्ह्यांची नोंद, नाइट कल्चरमुळे वाढली व्यसनाधीनता
Rajya Sabha Election : सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.