Nagpur Smugglers: नागपुरात एमडी तस्करांमध्ये ‘गँगवॉर’, पैशाचा वादातून झाडलेली गोळी घूसली पायात, पाच जणांवर गुन्हे दाखल

नागपूर शहरात गोळीबाराचे सत्र सुरूच असून कपिलनगर येथे गोळीबाराचे प्रकरण ताजेच असताना, सीताबर्डीमध्ये बुधवारी (ता.३) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास एमडी तस्कराने मित्र असलेल्या दुसऱ्या तस्करावर गोळीबार केला.
नागपुरात एमडी तस्करांमध्ये ‘गँगवॉर’, पैशाचा वादातून झाडलेली गोळी घूसली पायात, पाच जणांवर गुन्हे दाखल
Nagpur Esakal
Updated on

Nagpur MD Drugs Smugglers Gangwar: नागपूर शहरात गोळीबाराचे सत्र सुरूच असून कपिलनगर येथे गोळीबाराचे प्रकरण ताजेच असताना, सीताबर्डीमध्ये बुधवारी (ता.३) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास एमडी तस्कराने मित्र असलेल्या दुसऱ्या तस्करावर गोळीबार केला. त्यात कुख्यात गुंड जखमी झाला. या घटनेने पोलिस विभागात खळबळजनक उडाली असून पोलिसांनी दोन्ही गटांच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करीत चौघांना अटक केली आहे.

जैनुल आबुद्दीन (वय ३०, रा. गड्डीगोदाम, सदर) असे जखमीचे आणि मृणाल मयूर गजभिये (वय २९, रा. आनंदनगर), अब्दुल रहमान, राजा अब्दुल जमाल खान, अंशुल अशी आरोपींची नावे आहेत. जैनुल आणि मृणाल यांच्यावर एमडी तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणाल आणि जैनुल दोघेही दोन महिन्यांपूर्वी ते कारागृहातून बाहेर आले. दोघेही मित्रच असून जैनुल आणि मृणालचा काही महिन्यांपासून एमडीच्या खरेदी-विक्रीवरून पैशाचा वाद सुरू आहे. यामुळे दोघांचेही यापूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. विशेष म्हणजे, बुधवारी सकाळी त्यांचे भांडण झाले. त्यामुळे मृणालकडून पैसे घेण्यासाठी तो सकाळीच सव्वाआठ वाजताच्या सुमारास आनंदनगर येथे चार ते पाच जणांसोबत आला. मात्र, मृणालने त्याला घरी न येता जवळच मैदानात भेटण्यासाठी बोलाविले. (Latest Marathi News)

मात्र, मृणालने जाताना सोबत पिस्तूल घेतले. जैनुल आणि त्याचे साथीदार येताच, त्यांनी मृणालला पैशांची मागणी केली. यावेळी मृणाल आणि जैनुलचे पुन्हा भांडण झाले. त्यामुळे मृणालने थेट पिस्तूल काढले. जैनुलने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पिस्तुलातून एक राऊंड फायर होऊन गोळी थेट जैनुलच्या मांडीमध्ये शिरली. त्यानंतरही जैनुलने त्याची पिस्तूल हिसकावून तेथून पळ काढला.

त्यानंतर तो उपचारासाठी मेयोत दाखल झाला. दरम्यान ही माहिती सीताबर्डी पोलिसांना मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम चोरमोले यांच्या ताफा घटनास्थळी दाखल होत तपास सुरुवात केली. त्यांनी मृणालला ताब्यात घेतले. विचारणा केली असता त्याने हकिकत सांगितली. पोलिसांनी त्याच्यावर ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याशिवाय पैशाचा मागणीसाठी जैनुल मृणालकडे गेल्याने त्याच्यासह दोन नातेवाइकांवरही खंडणीचा गुन्हा दाखल केला.

नागपुरात एमडी तस्करांमध्ये ‘गँगवॉर’, पैशाचा वादातून झाडलेली गोळी घूसली पायात, पाच जणांवर गुन्हे दाखल
Devendra Fadnavis: देशातील महिला पूर्ण करणार मोदींचं '४०० पार'चं स्वप्न, देवेंद्र फडणवीसांचा वर्ध्यात प्रचाराचा शंखनाद

एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न

जैनुलवर गोळीबार करीत, मृणालने जखमी केले. मात्र, ही बाब पोलिसांपर्यंत जाऊ नये याची दोघेही काळजी घेत होते. त्यामुळे या अवस्थेतही जैनुलने त्याचेशी संपर्क साधला. यावेळी मृणालने त्याला पिस्तूल परत मागितली. त्यावरून त्याने पिस्तूल देतो पण याबाबत पोलिसांना न सांगण्याची अट मान्य करून मृणालने अंशुल नावाच्या मित्राला पाठविले. जैनुलचे वडील आणि नातेवाइकांच्या माध्यमातून पिस्तूल मृणालला परत देण्यात आले.(Latest Marathi News)

माझी गोळी काढून द्या, डॉक्टरांना केला फोन

गोळीबारानंतर जैनुलच्या मांडीत गोळी अडकल्याने ती काढण्यासाठी त्याने त्याच्या फोनवरून एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन केला. गाडीत ठेवलेली पिस्तुलातून अपघाताने गोळी चालली आणि ती मांडीत अडकली असल्याने ती काढून देण्याची विनंती केली. हे पोलिसांना सांगू नका असेही बजावले. डॉक्टरांनी पिस्तुलाचे लायसेन्स आहे का अशी विचारणा केली असता, ते नसल्याचे जैनुलने सांगितले. त्यावर डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी स्पष्ट नकार दिला. त्रास वाढल्याने तो मेयोत दाखल झाला.

नागपुरात एमडी तस्करांमध्ये ‘गँगवॉर’, पैशाचा वादातून झाडलेली गोळी घूसली पायात, पाच जणांवर गुन्हे दाखल
BMC: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्याची ९५ लाख रूपयांची पाणीपट्टी थकली; BMC कधी करणार वसुली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.