Nagpur : १०० रुपयात वैद्यकीय रजा

आयुक्तांचा खुलासा : पोलिसच आरोपींच्या पिंजऱ्यात
Nagpur Medical leave 100 Commissioner statement
Nagpur Medical leave 100 Commissioner statement
Updated on

नागपूर : गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात जवळपास १५० पोलिस कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय रजा घेतल्या होत्या. यात दोन डॉक्टरांच्या स्वाक्षरींचे ९० टक्के पास आढळून आले आहेत. त्यामुळे हे दोन डॉक्टर सुद्धा संशयाच्या घेऱ्यात आले आहे. या डॉक्टरकडून १०० रुपयात वैद्यकीय पास बनवून सुट्टी घेतल्याचे चौकशीत आढळले असल्याचा खळबळजनक खुलासा खुद्द पोलिस आयुक्तांनी केला आहे. यामुळे पोलिसच आता आरोपींच्या पिंजऱ्यात उभे आहेत.

नुकताच सुचिता बालमवार (५०) या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला. कामावर घाई गडबडीत येत असताना अपघात होऊन मृत्यू झाला अशी अंतर्गत चर्चा सुरू होती. पोलिस आयुक्तांनी या अपघातातबद्दल दुःख व्यक्त केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत बंदोबस्त सुरू आहे. आता पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया सामना, नवरात्री, दुर्गा देवी विसर्जन, दसरा, रावन दहन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ड्रॅगन पॅलेस व संघाचा कार्यक्रम असा बंदोबस्ताचा ताण आहे. त्यामुळे ड्यूटीवरील पोलिसांचा ‘रोल कॉल’ हा अनिवार्य आहे.

पोलिसांची बंदोबस्तात केवळ आठ तासाची ड्यूटी नसते तर १२ तास ड्यूटी करावी लागते. या काळात बरेचसे पोलिस कर्मचारी चुकीच्या पद्धतीने वैद्यकीय रजा मिळवून घेतात. गणेशोत्सव काळात १५० लोकांनी वैद्यकीय रजा मिळविल्या. त्यापैकी ९० टक्के कर्मचाऱ्यांच्या रजा केवळ दोन डॉक्टरांच्या सहीच्या होत्या. या रजा १०० रुपये देऊन मिळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दोन डॉक्टरांवर संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

वैद्यकीय रजेत बदल

पोलिस आयुक्तालयात सिक पास (वैद्यकीय रजा) मिळेल. ज्या कर्मचाऱ्याची प्रकृती खरच खालावली आहे. त्यांच्या घरी पोलिस रुग्णालयाची रुग्णवाहिका जाईल. प्रकृतीची तपासणी करून त्यांना वैद्यकीय रजा आता मिळणार आहे. या नियमाला आता अधिक कडक करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.