Nagpur Mayo Hospital: जनरेटरमध्ये केस अडकलेल्या दहा वर्षीय चिमुकलीला मिळाले जीवनदान, डॉक्टरांच्या प्रयत्नांना मोठं यश

कामठी परिसरात घराजवळ खेळताना एका १० वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकले. केसासकट त्वचा निघाली होती. गंभीर जखमी झालेल्या मुलीला कुटुंबीयांनी मेडिकलच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये दाखल केले.
Nagpur Hospital
Nagpur HospitalEsakal
Updated on

Nagpur Doctors Saved Life of 10 Years Old Girl: कामठी परिसरात घराजवळ खेळताना एका १० वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकले. केसासकट त्वचा निघाली होती. गंभीर जखमी झालेल्या मुलीला कुटुंबीयांनी मेडिकलच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये दाखल केले. मुलीची स्थिती बघता तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तब्बल दोन महिन्याच्या उपचारानंतर ती बरी झाली.

नातेवाइकांनी दोन्ही हात जोडून मेडिकलच्या ट्रॉमा युनिटमधील डॉक्टरांचे आभार मानले. मुलीनेही तुम्हीच माझ्यासाठी देवदूत, अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त करीत दोन्ही हात जोडले. अधिष्ठातांसह वैद्यकीय अधिक्षक आणि सर्व उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी चिमुकलीच्या पाठीवरून हात फिरवला. चिमुकली मानवी जाईस्तोवर हात जोडून होती.

मानवी ईश्वर इंगोले असे या दहा वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. कामठीतील रहिवासी असलेली ही मुलगी घराजवळ खेळत होती. तिच्या बाजूलाच एक जनरेटर सुरू होते. खेळताना मुलगी अचानक जनरेटरच्या बाजूला पडली. जनरेटरच्या पट्ट्यामध्ये केस अडकले. त्यामुळे ती जनरेटरमध्ये ओढली गेली.

मुलगी किंचाळल्याने तत्काळ जनरेटर बंद केले गेले. मात्र, तोपर्यंत केसांसहित संपूर्ण त्वचा निघाली. रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलीला मेडिकलमध्ये हलवण्यात आले. ट्रॉमा युनिटमध्ये तिच्यावर उपचार झाले. तातडीने प्लास्टिक सर्जरी विभागाला सूचना देत रुग्ण त्यांच्याकडे हस्तांतरित केला गेला. शस्त्रक्रियेसाठी झटपट तिला शस्त्रक्रिया गृहात हलवले गेले.

Nagpur Hospital
Mukhtar Ansari: मुख्तार अन्सारीने योगी आदित्यनाथ यांना केलं होतं टार्गेट! कसा वाचला जीव? IPS अधिकाऱ्याने सांगितला थरारक अनुभव

वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी त्यावेळी पुढाकार घेतला होता. मेडिकलमधील डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने अतिशय कुशलतेने दोन टप्प्यांमध्ये ''स्कीन ग्राफ्टिंग'' शस्त्रक्रिया केली.

दोन महिन्यानंतर मानवीला सुटी देण्यात आली. अतिशय क्लिष्ट शस्त्रक्रिया कुशलतेने पार पाडल्याने येथील डॉक्टरांचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी कौतुक केले. डॉ. अब्दुल कुरेशी, डॉ. श्रीकांत पेरका आणि त्यांच्या सहायक पथकाने शस्त्रकियेतून मुलीचे प्राण वाचले.

Nagpur Hospital
Aranmanai 4 Trailer Out: हॉरर आणि कॉमेडीचा तडका! तमन्नाच्या 'अरनमनई 4' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.