नागपूर मेडिकलमधील सोलर पार्क पाच वर्षांनंतरही कागदावरच

वीज,पाणी बिलासाठी भरावे लागतात पावणेतीन कोटी
Nagpur Medical Solar Park electricity and water bills after five years
Nagpur Medical Solar Park electricity and water bills after five yearssakal
Updated on

नागपूर : वीज आणि पाणी बिलासाठी मेडिकलला वर्षाकाठी पावणेतीन कोटी रुपये मोजावे लागतात. यावर पर्याय म्हणून ‘सोलर पार्क’ची निर्मिती करण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, अजूनही हा प्रकल्प कागदावरच आहे. विशेष म्हणजे मेडिकलला कमर्शिअल दरात विजेचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे.

आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकलमध्ये नवनवीन विभागाची निर्मिती होऊ घातली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे. सध्या वीज बिलासाठी दर महिन्याला २० लाख रुपये भरावे लागतात. आर्थिकदृष्ट्या मेडिकल प्रशासनाला परवडणारा हा प्रकल्प होता. मात्र सत्ता बदलानंतर नव्याने याकडे बघण्यात येत आहे. हा प्रकल्प उभारल्यानंतर दोन लाख ५६ टनापर्यंतचे कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन प्रदूषण दूर होणार होते. हा प्रकल्प दुहेरी फायद्याचा होता, परंतु शासन उदासीन आहे.

छतावर सौर पॅनल

मेडिकल आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात उभारणाऱ्या या सनब्लेस सोलर पार्कच्या प्रकल्पातून १६४८ किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे.अपघात विभाग, वॉर्ड क्र. १३, १२, २८, ३२, ३३, पूर्व भागातील संपूर्ण विंग, मार्ड वसतिगृह, डेंटल कॉलेज, मुलामुलींचे वसतिगृह, नर्सिंग होस्टेल या इमारतींच्या छतावर सौर पॅनल लावले जाणार आहेत. साधारण १० हजार ३०० स्क्वेअर मीटरवर हे पॅनल असतील. यासंदर्भात प्रभारी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगण्यात येईल, असे सांगितले.

२०१७ मध्ये सादर झाला होता प्रस्ताव

सौरऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव २०१७ मध्ये शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावेळी ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण’कडून सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मेडिकलच्या इमारतीची पाहणी करण्यात आली होती.परंतु, हा ८ कोटी रुपयांचा प्रकल्प पाच वर्षांनंतरही कागदावरच राहिला.

मेडिकलमधील विभाग

  • ट्रॉमा केअर सेंटर

  • सात अतिदक्षता विभाग

  • मुला-मुलींचे वसतिगृह

  • ५० वॉर्ड

  • सात शस्त्रक्रियागार

  • विविध बाह्यरुग्ण विभाग

  • किरकोळ शस्त्रक्रियागार

  • रिकव्हरी सेंटर

  • कॅज्युअल्टी

  • बीएस्सी नर्सिंग कॉलेज

भविष्यात येणारे विभाग

  • कॅन्सर इन्स्टिट्यूट

  • सिकलसेल सेंटर

  • स्पाईन सेंटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.