Brick making Labour Child Education: मेळघाटच्या चिखलदरा व धारणी तालुक्यातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवरील आदिवासी कुटुंबांनी मोठ्या प्रमाणावर शहराकडे वीटभट्ट्यांवर रोजगारासाठी स्थलांतर केले आहे. या स्थलांतरामुळे आदिवासी कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शिवाय त्यांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील गंभीर झाला आहे.
भारतीय संविधानाची निर्मिती करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येकाला प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे, अशी तरतूद करून ठेवली होती. त्यानंतर देशातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे, असा शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये संसदेत पारित करण्यात आला.
त्यालाही आता १५ वर्षांहून अधिक काळ लोटला. आजही देशातील कोट्यवधी मुले शिक्षणापासून दूर आहेत, यामध्ये स्थलांतरित कामगारांच्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. या स्थलांतरितांपैकीच एक घटक म्हणजे वीटभट्टीवर काम करणारे कामगार दरवर्षी सहा महिने आपले गाव, जिल्हा व राज्य सोडतात. ते मुलांना सोबत घेऊन येतात. या सहा महिन्यांच्या काळात या मुलांची शाळा पूर्णपणे बंद असते. (Latest marathi news)
त्यामुळे प्रतिभा असूनही ती शिक्षणापासून तुटतात आणि पिढ्यान् पिढ्या मजुरीच्या विळख्यात अडकून पडतात. मेळघाटसह महाराष्ट्रात दरवर्षी शिक्षणाबाहेर फेकल्या जाणाऱ्या मुलांची संख्या काही लाखांमध्ये आहे, पण याकडे कोणाचेही लक्ष नाही. ज्यामुळे आजही शेकडो मुले दरवर्षी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर मेळघाटातील आदिवासी कुटुंबे शहराकडे मुक्कामी गेले आहेत. वीटभट्टी आणि इमारत बांधकामाच्या नजीकच झोपड्या बांधून त्यांनी आपला संसार थाटला आहे. या रोजगाराच्या भटकंतीत मात्र त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा प्रश्न जटिल बनला आहे.
रोजगाराच्या शोधात वीटभट्ट्यांवर स्थलांतरित झालेल्या आदिवासी कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता अंजनगावबारी तथा कोंडेश्वर येथे शाळा उघडण्यात आल्या आहेत. त्यासोबतच वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांचा तत्काळ शोध घेऊन लगतच्याच प्राथमिक शाळेत सामावून घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली असून, शिक्षणापासून मुले वंचित राहणार नाहीत याची काळजी आम्ही घेत आहोत.-बुधभूषण सोनोने, शिक्षणाधिकारी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.