नागपूर : नागपूर महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर बसवणार असा आमचा मुळीच दावा नाही. मात्र विरोधी बाकावरची नगरसेवकांची संख्या लक्षात घेता आम्हाला येथे मोठा स्कोप दिसत आहे. तो आम्ही निश्चित भरून काढू शकतो, असा विश्वास मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला.
देशपांडे यांनी मंगळवारी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विदर्भात मनसेचे सुरू असलेले मायक्रो प्लानिंग आणि भविष्यातील संधी याविषयी अनौपचारिक गप्पा मारल्या. १७ वर्षांत मनसे विदर्भात फारसी फोफावली नाही. आमचे व विदर्भातील पदाधिकाऱ्यांचे कुठे व काय चुकले, याचा आम्ही आढावा घेतला आहे. त्याकरिता जुनी कार्यकारिणी बरखास्त केली. आता झाले गेले विसरून आम्ही नव्या दमाने कामाला लागणार आहोत. विदर्भातील काही ज्वलंत विषय आम्ही आंदोलनासाठी हाती घेणार आहोत. आमच्यासाठी नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर ही शहरे महत्त्वाची आहेत. या तीनही महापालिका आम्ही लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
युतीचे सांगता येत नाही
राज्याच्या उपराजधानीचे शहर असल्याने नागपूरवर आमचे विशेष लक्ष राहणार आहे. भाजपसोबत युती करणार की नाही हे आत्ताच सांगता येत नाही. मात्र निवडणुकीच्या माध्यमातून मनसेचे अस्तित्व निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. नागपूरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या सर्वांनाच माहीत आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांची नावे बोटावर मोजता येतात. त्यामुळे विरोधकांमध्ये आपली जागा निर्माण करण्यात मनसेला मोठा वाव असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. यावेळी शहर अध्यक्ष विशाल बडगे आणि चंदू लाडे उपस्थित होते.
मायक्रो प्लानिंग
मुंबईप्रमाणे विदर्भातील प्रमुख शहरांमध्ये निडणुकीसाठी मायक्रो प्लानिंग केले जाणार आहे. त्यापूर्वी शहर अध्यक्षांपासून बुथ प्रमुखांप्रमाणे कार्यकर्त्यांची फळी तयार केली जाईल. मनसेचे एक ॲप आहेत. त्यात प्रत्येक वस्ती, प्रभाग, गल्लीतील कोण आपले याची नोंद घेतली जाते. त्यानुसार आपले व आपल्या जवळच्यांवर विशेष लक्ष दिले जाईल. पदाधिकारी व संभाव्य उमेदवार त्यांच्या भेटीगाठी घेतील. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्यांना मतदानाचा माध्यमातून आपल्याकडे वळवण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे देशपांडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.