Nagpur : विकण्यासाठी मोबाईल न दिल्याने आवळला जन्मदात्या आईचा गळा; व्यसनी मुलाचे कृत्य आजारी असल्याचा केला बनाव

रामनाथ हा व्यसनी असल्याने तो आईसोबत श्री संत गजानन महाराजनगरात राहतो.
nagpur
nagpursaka
Updated on

नागपूर - दारू आणि नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने आईला विकण्यासाठी मोबाईल मागितल्यावर तो देण्यास नकार दिल्याने तिचा रुमालाने गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (ता.१९) रात्री हुडकेश्‍वरमधील श्री संत गजानन महाराजनगरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.

रामनाथ गुलाबराव बडवाईक (वय २८) असे आरोपी मुलाचे नाव असून कमला गुलाबराव बडवाईक (वय ४७) असे मृत आईचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला यांना तीन मुले आहेत. त्यापैकी मोठा मुलगा पत्नीसह मध्यप्रदेशात राहतो. लहान मुलगा दीपक हा पत्नीसह मनिषनगरात राहतो.

विकण्यासाठी मोबाईल न दिल्याने आवळला जन्मदात्या आईचा गळा

आपला मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने रागाचा भारात तिला ढकलले आणि ती खाली पडताच, खिशातून रुमाल काढून तिचा खून केला. दरम्यान नातेवाइकांसह भावांना आईची प्रकृती बिघडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. मात्र, लहान भाऊ दीपक याला संशय आल्याने त्याने याबाबत हुडकेश्‍वर पोलिसांना गुरुवारी माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रशांत माने यांच्यासह ताफा घरी पोहोचून त्यांनी कमला यांच्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून केल्याची माहिती समोर येताच, रामनाथ याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने खुनाची कबुली दिली.

nagpur
Nagpur : एटीएसनंतर परवेझवर इनकम टॅक्सचा फेरा; बेहिशेबी मालमत्तेचा तपास; एटीएसची कारवाई

आईचा मृतदेह घेऊन फिरला खासगी दवाखाने

आईची तब्येत अचानक खराब झाल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात नेत असल्याचा बनाव रामनाथ याने तिचा खून केल्यावर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्याने दोन खासगी रुग्णालयात नेल्यावर त्याला मनाई करण्यात आली आणि मेडिकलमध्ये दाखल करण्यास सांगण्यात आले. मात्र, त्याने मेडिकलमध्ये न नेता घरी नेत भावांना आईचा आजारी असल्याने मृत्यू झाल्याची वार्ता कळविली.

nagpur
Nagpur : हसनबागमध्ये ‘एटीएस’चे छापे तीन ठिकाणांहून घेतले दोघांना ताब्यात; २७.५० लाख जप्त, बनावट चलनाचा संशय

दीपकला आला संशय

रामनाथ हा व्यसनी असल्याने तो त्यासाठी काहीही करू शकतो, याचा अंदाज लहान भाऊ दीपक याला असल्याने त्याने घरी जाताच, हातपाय कडक होत असल्याने तेल आणि कापूर लावण्यासाठी बारकाईने बघितले. त्यावेळी तिच्या गळ्यावर जखम, अंगठ्याला निळी शाई आणि पायालाही जखम झाल्याचे दिसल्याने त्याने पोलिस ठाणे गाठून आईच्या खुनाची शंका व्यक्त केली. त्यावरून पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचे ठरविले. त्यानंतर खुनाचा खुलासा झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.