नागपूर : तीन मिटर रीडिंग एजन्सी बडतर्फ

महावितरणची कारवाई, अभियंत्यांनाही कारणे दाखवा नोटीस
Nagpur MSEB action Three meter reading agency
Nagpur MSEB action Three meter reading agencyesakal
Updated on

नागपूर - अचूक वीज मिटर रीडिंग बाबत ग्राहकांच्या तक्रारी होत्या. त्याचप्रमाणे सरासरीपेक्षा जास्त वीज बिल येत असल्याने ग्राहकांमध्ये महावितरणबाबत नाराजी होती. महावितरणने याची गंभीर दखल घेऊन विदर्भातील तीन मिटर रीडिंग एजन्सींना बडतर्फ केले. या एजन्सींना गेल्या दोन महिन्यापासून सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यात सुधारणा करण्यात आल्या नसल्याने ही कारवाई करण्यात आली. तर संबंधित तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

ग्राहकांना विजेच्या वापराप्रमाणेच अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. त्यासाठी मीटर रीडिंग हा बिलिंगचा आत्मा आहे. महावितरणकडून वीजमीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना सुरु आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यात यावी. मीटर रीडिंगच्या अचूकतेसाठी कोणतीही हयगय करू नये.

सूचना देऊनही अचूक रिडिंगसाठी सुधारणा न झाल्यास मीटर रीडिंग एजन्सी व जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी मीटर रीडिंग संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत दिला. मीटर रिडिंगमध्ये अचूकता नसल्यास ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

बैठकीमध्ये कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी उपस्थित होते. मुख्य अभियंता संजय पाटील (देयके व महसूल), सुनील देशपांडे (चंद्रपूर), दिलीप दोडके (नागपूर), अनिल डोये (अकोला), पुष्पा चव्हाण (अमरावती), राजेश नाईक (गोंदिया), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार तसेच अधीक्षक अभियंते उपस्थित होते.

वितरणलाही आर्थिक फटका

महावितरणच्या महसुलाचे देखील नुकसान होते. हे प्रकार टाळण्याची प्राथमिक जबाबदारी मीटर रीडिंग एजन्सीजवर आहे. एजन्सीजविरुद्ध केवळ कारवाई हा मुख्य उद्देश नाही. परंतु, वारंवार सूचना देऊनही रीडिंग एजन्सीजच्या कामात सुधारणा होत नसेल तर मात्र कारवाई अटळ आहे. सोबतच जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येईल असेही ताकसांडे यांनी बैठकीत स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.