Nagpur | प्रभाग रचनेबाबत उत्कंठा अन् भीतीही! नगरसेवकांत कुजबूज

तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार सिमांकनाचे काम प्रशासनाकडून जोमात सुरू असून ऑक्टोबरअखेर ते पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनातील सूत्राने व्यक्त केली
nagpur
nagpursakal
Updated on

नागपूर : तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार सिमांकनाचे काम प्रशासनाकडून जोमात सुरू असून ऑक्टोबरअखेर ते पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनातील सूत्राने व्यक्त केली. तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पन्नास प्रभाग होणार आहे. सद्यःस्थितीतील प्रभागातील काही भाग वेगळा करण्यात येणार आहे. परंतु विकास कामे केलेला भाग अपरिचित भागाशी जोडून नवा प्रभाग तयार केल्यास विद्यमान नगरसेवकांची अडचण होणार आहे. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. अनेक नगरसेवक प्रभागरचनेबाबत अधिकाऱ्यांकडूनही कानोसा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

nagpur
एक पेपर सकाळी, दुसरा दुपारी ठेवा आणि हेलिकॉप्टर द्या; संतप्त उमेदवाराची मागणी

महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारीत अपेक्षित आहे. परंतु प्रभागरचनेचा कच्चा आराखडा, त्यावर आक्षेप, हरकती, ही सर्व प्रक्रिया बघता निवडणूक दोन महिने पुढे जाण्याची शक्यता प्रशासनातील अधिकारी व्यक्त करीत आहेत. निवडणूक पुढे जात असली तरी विद्यमान नगरसेवकांत प्रभागरचनेबाबत उत्कंठा दिसून येत आहे. महापालिकेचा निवडणूक विभाग तीन सदस्यीय प्रभागरचनेनुसार सिमांकनाचा कच्चा आराखडा तयार करीत आहे. यात विद्यमान चार सदस्यीय प्रभागातून काही भाग वेगळा होणार आहे.

विद्यमान चारच्या प्रभागात ज्या भागात नगरसेवकांनी विकास कामे केली, तोच भाग वेगळा झाला तर कसे करायचे? अशी चिंता व कुजबूज नगरसेवकांत दिसून येत आहे. आयुक्तांनी विकास कामांना ब्रेक लावल्यानंतरही त्यांच्याशी संघर्ष करून, काहींनी प्रेमाने आपापल्या प्रभागात विकासासाठी निधी खर्च केला. याचा पुढील मनपा निवडणुकीत किती लाभ मिळणार? यावर आता नगरसेवकांत खलबते सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांवर प्रभाव पाडणाऱ्या काही नगरसेवकांनी प्रभाग रचनेबाबत कानोसा घेण्याचाही प्रयत्न केला.

परंतु प्रभाग रचनेच्या कच्च्या आराखड्याची माहिती गोपनीय ठेवण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश असल्याने अधिकाऱ्यांकडून नगरसेवकांची निराशा होत आहे. त्यामुळे काही नगरसेवक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडील शिपायांशी सलगी करून माहिती करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु प्रभागाच्या संख्येत वाढ होणार असल्याने अनेकांना धक्के बसणार आहे. त्यात कोण दुर्दैवी ठरतो व कोण सुदैवी? हे चित्र पुढील महिन्यांत स्पष्ट होणार आहे.

nagpur
"अमेरिकी कंपन्यांकडून भारताच्या आर्थिक सुधारणांचं कौतुक"

‘ते’ उमेदवारही सक्रिय

मागील २०१७ मधील निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मुस्लिम लीग, बसपाचे अनेक उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. यात त्यावेळी नगरसेवक असलेले राजू नागुलवार, साधना बरडे, सुरेश जग्यासी, अभिषेक शंभरकर, किरण पाटणकर, सुधीर राऊत, देवेंद्र मेहर, नीता ठाकरे, प्रशांत धवड यांना पराभव पत्करावा लागून दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागले होते. हे माजी नगरसेवक तसेच दुसऱ्या क्रमांकावरील इतर उमेदवारांतही प्रभागरचनेबाबत उत्सुकता दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()