Nagpur Municipal Corporation: १७ लाखाच्या GPS घड्याळ्यासह सफाई कर्मचारी देखील गायब, कर्मचाऱ्यांनी नेमले 'पोट कर्मचारी'

शहराची साफसफाई नियमित व्हावी आणि कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवता यावी याकरिता महापालिकेने तब्बल १७ लाख रुपये खर्चून जीपीएस घड्याळ खरेदी केले होते.
Nagpur Municipal corporation Election
Nagpur Municipal corporation Electionsakal
Updated on

Nagpur Municipal Corporation: शहराची साफसफाई नियमित व्हावी आणि कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवता यावी याकरिता महापालिकेने तब्बल १७ लाख रुपये खर्चून जीपीएस घड्याळ खरेदी केले होते. आता एकाही कर्मचाऱ्यांच्या मनगटावर घड्याळ दिसत नसल्याने ते गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे महापालिकेचे अनेक नियमित कर्मचारी सफाईला जातच नाही. त्यांनी सफाईसाठी पोट कर्मचारी नियुक्त केल्याचेही आढळून आले आहे. हिलटॉप, सेवानगर, सुदामनगरी, अजयनगर, अंबाझरी, पांढराबोडी, ट्रस्ट लेआऊट या परिसरात सफाई करताना पोट कर्मचारी दिसतात. त्यांच्याकडे गणवेश आणि महापालिकेने दिलेले जीपीएस घड्याळ नाहीत. त्यामुळे नियमित कर्मचारी नेमके कुठले काम करतात, त्यांना वेतन का देतात असा प्रश्न निर्माण होतो.

महानगरपालिकेने खरेदी केलेल्या घड्याळींच्या देखभालीवर २०० रुपये प्रति घड्याळ खर्च केला जात आहे. याचा उपयोग शून्य असताना अधिकारी संबंधित कंपनीला दर महिन्याला पैसे दिले जात आहे. यातून सर्वांचे खिसे गरम होत असल्याने कारवाई केली जात नाही.

अनेक कर्मचाऱ्यांनी आपले जॅकटही पोट कर्मचाऱ्यांना दिले असल्याचे आढळून आले आहे. अधिकाऱ्यांना फोन केला जातो. निवेदन दिले जाते. त्यानंतर छोट्या छोट्या समस्या सोडवल्या जात नाही. हा मनमानी कारभार थांबवा अन्यथा आंदोलनाचा इशारा शहर काँग्रेस कमिटीचे सचिव अक्षय समर्थ व शत्रुघ्न महतो यांनी दिला आहे.

Nagpur Municipal corporation Election
Reservation System: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असताना बिहार सरकारचा मोठा निर्णय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.