Nagpur Municipal Corporation : दिवाळीत मनपा निवडणुकीचे फटाके

भूमिपजून, लोकार्पणाच्या कार्यक्रमांमुळे कार्यकर्ते लागले कामाला
Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal Corporationsakal
Updated on

नागपूर : सध्या राजकीय वर्तुळात महापालिकेची निवडणूक केव्हा होणार याचीच चर्चा सुरू आहे. शहरात धडाक्यात सुरू असलेल्या भूमिपूजन आणि लोकार्पणाच्या कार्यक्रमांवरून दिवाळीत निवडणुकीचे फटाके फुटणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

नागपूर, मुंबईसह अनेक शहरातील महापालिकांचा कार्यकाळ संपून वर्ष उलटले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना प्रभागाची रचना, सदस्य संख्या आदी निवडणुकीची जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. सत्तांतरनानंतर शिंदे सेना आणि भाजपने आघाडीने केलेल्या प्रभाग रचनेला स्थगिती दिली.

तसेच वाढीव सदस्य संख्येलाही आव्हान दिले. याशिवाय ओबीसी आरक्षणाचा निर्णयसुद्धा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे सर्व प्रक्रियाच वर्षभरापासून थांबलेली आहे. या घडामोडींमुळे महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्येही निरुत्साह पसरला होता. परवडत नसल्याने अनेक आरंभशुरांनी निवडणुकीसाठी सुरू केलेली समाजसेवा बंद केली आहे.

अलीकडे सत्ताधारी भाजपने लोकार्पण आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू केलेल्या निवडणूक जवळ आल्याचे संकेत कार्यकर्त्यांना मिळाले आहेत.

दिवाळीत मनपा निवडणुकीचे फटाके

त्यामुळे अनेक कार्यकर्ते अलर्ट झाले आहेत. अनेकांना पाणी टंचाईची आठवण झाली आहे. प्रलंबित कामांच्या फाइलींवरील धुळ झटकल्या जात आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होतील, असा अंदाच वर्तविला जात आहे.

चार सदस्यांच्या प्रभागामुळे भाजपच्या नगरसेवकांबाबत मोठी नाराजी निर्माण झाली होती. वर्षभराच्या विलंबामुळे लोकांमधील नाराजी दूर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीला पाच ते सहा महिन्यांचा अवधी असल्याने वज्रमूठ फोडण्यात भाजपला कितपत यश येथे यावरच महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.

महाविकास आघाडी कायम राहिल्यास जागावाटपावरून मोठा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बघता आघाडी कायम राहिली तरी फायदा आणि नाही राहिली तर नुकसान नाही असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे.

भाजप, काँग्रेसचे वेगवेगळे गणित

जी-२० सारख्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून भाजपने शहरात कोट्‍यवधी रुपये खर्च करून आपणच नागपूरचा विकास करू शकतो हे दाखवून दिले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद लाभल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.