Nagpur Education:मनपा देणार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सुविधा! २५ टक्के जागा आरक्षित, शुल्कात २० टक्के सवलत

शहरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ उभारण्याच्या दृष्टीने मनपाने महत्त्वाचे पाउल उचलले आहे.
Nagpur Education:मनपा देणार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सुविधा! २५ टक्के जागा आरक्षित, शुल्कात २० टक्के सवलत
Updated on

Nagpur Municipal Corporation Educational Facilities: शहरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ उभारण्याच्या दृष्टीने मनपाने महत्त्वाचे पाउल उचलले आहे. महानगरपालिकेने मौजा वाठोडा येथे विकास आराखड्यांतर्गत सार्वजनिक संस्था प्रयोजनार्थ आरक्षित असलेल्या १८.३५ हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.


महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे नामांकित संस्थेकडून आवेदन मागविण्यात आले आहे. पब्लिक, प्रायव्हेट, पार्टनरशिप अर्थात सार्वजनिक खासगी भागीदारीच्या तत्वावर या प्रकल्पाला मूर्त रूप दिले जाणार आहे. नागपूर शहरातील वाठोडा येथील १८.३५ हेक्टर जमीन शासनाच्या नगरविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ‘सार्वजनिक संस्था’ या वापराकरिता आरक्षित होती.

या १८.३५ हेक्टर जमिनीवर नर्सरी, प्री-प्रायमरी शिक्षणापासून ते बहुविद्याशाखीय उच्च अभ्यासक्रम, कार्यक्रमापर्यंतचे शिक्षण देता येणार आहे. मौजा वाठोडा येथील या आरक्षित जमिनीच्या आरक्षण प्रयोजनार्थ विकास करण्यासाठी मे. ऐक्सिनो कॅपिटल सर्विसेस संस्थेची प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. (Latest Marathi News)


सदर जागा भाडेपट्ट्यावर ३० वर्षांसाठी दरवर्षी ५ टक्के दराने भाडेमुल्यात भाववाढ करण्याच्या अटीसह दिली जाईल. एकूण १८.३५ हेक्टर जमीनीपैकी १६.३५ हेक्टर जागेमध्ये उच्च शैक्षणिक संस्था व २ हेक्टर जागेमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक शैक्षणिक संस्था (केजी २ ते हायर सेकंडरी) उभारण्यात येईल. या शैक्षणिक संस्थांमध्ये शहरातील रहिवाशांकरिता २५ टक्के जागा आरक्षित ठेऊन त्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये किमान २० टक्के सवलत देण्याची बाब निविदांमध्ये बंधनकारक करण्यात आले आहे.

Nagpur Education:मनपा देणार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सुविधा! २५ टक्के जागा आरक्षित, शुल्कात २० टक्के सवलत
राज्य सरकारचा आदेश बासनात! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या २२०० कोटींच्या पीककर्जाचे पुनर्गठन नाहीच; सोलापूर जिल्ह्यातील वस्तुस्थिती

प्रकल्पामध्ये २ हेक्टर जागेमध्ये शाळा, १६ हेक्टर जागेमध्ये उच्च शिक्षणाचे विद्यापीठ किंवा विद्यापीठाचे ऑफ कॅम्पस सेंटर उभारण्यात येईल. एकूण प्रस्तावित क्षमता ४०४० विद्यार्थ्यांच्या क्षमतेच्या कमीत कमी ५० टक्के व्यावसायिक अभ्यासक्रम तर उर्वरीत ५० टक्के क्षमता शैक्षणिक संस्था त्यांच्या निवडीच्या अभ्यासक्रम ठरवू शकतील. (Latest Marathi News)

Nagpur Education:मनपा देणार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सुविधा! २५ टक्के जागा आरक्षित, शुल्कात २० टक्के सवलत
Health Care News : 'हे' पदार्थ रोज सकाळी रिकाम्या पोटी खा; आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.