Yoga Day : जागतिक योग दिनासाठी नागपूर महापालिकेची जय्यत तयारी

यशवंत स्टेडियमवर भव्य स्टेजचे निर्माण, नागरिकांना ‘आपली बस’ची सेवा
Yoga Day
Yoga Daysakal
Updated on

नागपूर : महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग्य दिनाचा कार्यक्रम शुक्रवार, २१ जून रोजी धंतोलीतील यशवंत स्टेडियम येथे सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची तयारी जवळपास संपुष्टात आली असून याचा आढावा बुधवारी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी घेतला.

योग्य दिनाची थीम यंदा ‘योग फॉर सेल्फ अँड सोसायटी’ आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजातील सर्व घटकांना उपस्थित राहण्याचे आवाहन चारठाणकर यांनी केले. त्यांनी तृतीयपंथी, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, बचत गट यांच्यासह एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शहराचे आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

तसेच विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळचे प्रमुख रामभाऊ खांडवे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

यशवंत स्टेडियम येथे मोठ्या आकाराचे स्टेज तयार करण्यात येत आहे. योगाभ्यास करण्यासाठी नागरिकांनी स्वतः दरीची व्यवस्था करावी. तसेच पाण्यासाठी स्टीलची बॉटल वापरावी.

योग दिवस कार्यक्रम हा शून्य कचरा अर्थात ‘झीरो वेस्ट इव्हेंट’ वर आधारित राहणार आहे. योगाभ्यासा करीता यशवंत स्टेडियमवर पोहचण्यासाठी बसेसची सुविधा राहणार आहे. नागरिकांनी मनपाच्या बसेसचा वापर करावा, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

बैठकीत उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ. गजेंद्र महल्ले, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता वाईकर व इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Yoga Day
Nagpur Airport Threat : नागपूर विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; परिसराची कसून तपासणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.