नागपूर : एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गीताने ऑस्कर पुरस्कार जिंकून इतिहास रचला. महापालिकेलाही या गाण्याची भूरळ पडल्याचे दिसून येत आहे. मनपाने स्वतःच्या फेसबुक पेजवर या गाण्यातील नायकांच्या फोटोसह स्वच्छतेसाठी कचऱ्याचे वर्गीकरणच ऑस्करसारखे सर्वोच्च उपाय असल्याचा संदेश दिला आहे.
बाहुबली सिरीजनंतर दक्षिणेतील दिग्ददर्शक एस. एस. राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने जगभरात धूमाकूळ घातला. हा चित्रपट मागील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झाला असला तरी ‘नाटू नाटू’ हे गाणे नोव्हेंबर २०२१ मध्येही रिलिज झाले अन् त्यावर तरुणाईने थिरकण्यास सुरुवात केली.
हिंदीमध्ये हेच गाणे ‘नाचो नाचो’ म्हणून प्रदर्शित करण्यात आले अन् हिंदी प्रेक्षकांनीही ते डोक्यावर घेतले. या गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकून जगभरातील श्रोत्यांमध्ये या गाण्याची ‘क्रेज’ सिद्ध केली.
संपूर्ण जगावर भूरळ घालणाऱ्या या गीताने महापालिकेवरही जादू केल्याचे फेसबुक पेजवरून दिसून येत आहे. महापालिकेने ‘नागपूर म्युन्सिपल कार्पोरेशन’ या अधिकृत फेसबुक पेजवर या गाण्यातील रामचरण व ज्यु. एनटीआर यांचा फोटो पोस्ट करीत ‘waste segregation your oscar-winning solution!’
अर्थात कचरा वर्गीकरण सर्वोच्च उपाय आहे, असा संदेश दिला आहे. महापालिकेने हा संदेश मुख्यमंत्र्यांचे अधिकृत पेज, महाराष्ट्र डीजीआयपीआर, स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छ भारत मिशन-अर्बन, मायगव्हइंडिया, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग ॲन्ड अर्बन अफेअर्स या पेजला टॅग केला आहे.
नागरिकांनी घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करावा, यासाठी महापालिका वेगवेगळ्या उपक्रमातून आवाहन करीत असते. चित्रपटांचा लोकांवर मोठा प्रभाव आहे. त्याचा वापर करून सोशल मीडियावरून कचरा विलगीकरणासाठी आवाहन करण्यात आले.
- डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.