शिवसेनेची आयडिया; नाराजी दूर करण्यासाठी ३ शहरप्रमुख आणि २ महानगरप्रमुख

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांमधील नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेत मोठे बदल
Nagpur municipal election Shiv Sena idea to dispel resentment
Nagpur municipal election Shiv Sena idea to dispel resentment
Updated on

नागपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांमधील नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. आधीच्या प्रमुखांना कायम ठेवत जोडीला एक अतिरिक्त महानगर तर एक शहर प्रमुख अशा दोन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तीन शहर तर दोन महानगर प्रमुख झाले आहेत. विस्तार करताना आधीच्या प्रमुखांचे पंख छाटले तर सातत्याने तक्रारी करणाऱ्यांना कार्यकारिणीच्या बाहेरच ठेवल्याने आणखी असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना महानगर प्रमुख करण्यात आले आहेत. सोबत प्रमोद मानमोडे यांनासुद्धा या पदावर कायम ठेवले. शहर प्रमुख म्हणून अलीकडेच शिवसेनेत परतलेले माजी सैनिक प्रवीण बरडे यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता नितीन तिवारी, दीपक कापसे आणि बरडे असे तीन शहर प्रमुख सेनेत असतील. नवनियुक्त शहर प्रमुख प्रवीण बरडे यांच्याकडे पूर्व व मध्य नागपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वीचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्याकडे पश्चिम व उत्तर नागपूर तर दीपक कापसे यांच्याकडे दक्षिण व दक्षिण पश्चिम नागपूरची जबाबदारी आहे.

महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याकडे दक्षिण-पश्चिम, मध्य व पश्चिम नागपूरची जबाबदारी कायम ठेवण्यात आली असून नवनियुक्त महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्याकडे पूर्व, दक्षिण आणि उत्तर नागपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मंगेश काशीकर यांच्याकडेतीन विधानसभेची जबाबदारी संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यकारिणीवरून मोठा असंतोष उफाळून आला होता. माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी पक्षाला सोडचिठ्‍ठी दिली तर दुसरे माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांनी डिमोशन केल्याने नवी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता. प्रमोद मानमोडे आणि दीपक कापसे यांना दक्षिण नागपूरची जबाबदारी सोपविल्याने येथून विधानसभेची निवडणूक लढलेले किशोर कुमेरिया हेसुद्धा नाराजच होते. महानगर प्रमुख करून त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. सहसंपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांच्याकडे तीन विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.