Nagpur : कळमन्यात गळा आवळून मुलाचा खून? पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

चंदन कन्हय्या लहरे असे मृतकाचे नाव आहे
crime
crimeesakal
Updated on

नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गुलमोहरनगर परिसरात १७ वर्षीय मुलाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह घरासमोर पडलेल्या अवस्थेत रविवारी (ता.२) सकाळच्या सुमारास आढळून आला. याप्रकरणी त्याचा गळा आवळून खून झाल्याचा दावा घरच्यांनी केला असून पोलिसांनी प्राथमिक तपासणीमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

चंदन कन्हय्या लहरे असे मृतकाचे नाव आहे. तो टाइल्स फिटिंगचे काम करीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदनचे वडील कन्हय्या खासगी काम करतात. त्याला लहान भाऊ आहे. मध्यरात्री चंदन हा घराबाहेर निघाला. रविवारी सकाळी चंदन हा घराबाजूला असलेल्या पडक्या घरात बेशुद्ध अवस्थेत नागरिकाला दिसला. त्याच्या गळ्याभोवती दोर होता. नागरिकांनी त्याच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. वडिलांनी नागरिकांच्या मदतीने चंदनला घरात आणले.

crime
Nagpur : उड्डाणपुलासाठी जागा घेणार नाही ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

दरम्यान याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये पाठविण्यात आला. त्यातून घरच्यांनी त्याचा खून झाल्याचा दावा केला. दरम्यान प्राथमिक तपासणीमध्ये कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

गळफास लावून इसमाची आत्महत्या

नागपूर, ता. २ ः सदरमधील गोवा कॉलनी येथील ४३ वर्षीय इसमाने लोखंडी पाइपला ओढणी बांधून गळफास घेतला. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अमजद महमूद पठाण,असे मृताचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

crime
Nagpur : ब्लू लिफ बारमध्ये सापडली अल्पवयीन मुले हुक्का पिताना ११ जण ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.