Nagpur: नागपुरात १८० व्यक्तींचे हात झाले हत्तीपायासारखे, डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या मग केले आवाहन

नागपूर ग्रामीण भागात ३ हजार ८९७ हत्तीपायाचे तर ७४५ अंडवृद्धीचे रुग्ण आढळले आहेत.
Nagpur
NagpurSakal
Updated on

नागपूर - जिल्ह्यांत साडेपाच हजारांपेक्षा जास्त व्यक्तींच्या शरीरात हत्तीरोगाचे जंतू आढळून आले आहेत. हत्तीपायाच्या एकूण रुग्णांपैकी ३ टक्के (१८०) व्यक्तींच्या हातांमध्येही जंतू आढळले आहेत. त्यामुळे त्यांचे हात हत्तीपायासारखे फुगले आहेत.

जिल्ह्यात भिवापूर, उमरेड, हिंगणा, कुही, कामठी आणि नागपूर ग्रामीणमध्ये हत्तीपायाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळेच यावर्षी हत्तीरोग दूर करणाच्या दिशने पावले उचलण्यासाठी नागपुरातील याच तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.

Nagpur
Nagpur Metro : महाकार्डने नागपूरकरांचा प्रवास झाला सूकर

नागपूर ग्रामीण भागात ३ हजार ८९७ हत्तीपायाचे तर ७४५ अंडवृद्धीचे रुग्ण आढळले आहेत. नागपूर महापालिकेच्या हद्दीत हत्तीरोगाचे ९८५ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण ५ हजार ६४२ व्यक्तींच्या शरीरात हत्तीरोगाचे जंतू आहेत.

शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये प्रामुख्याने हत्तीरोग निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हत्तीरोग उच्चाटनासाठी २००४ पासून राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम राबवला जात असतानाही या रोगाचे उच्चाटन होऊ शकलेले नाही.

आकडे बोलतात

जिल्ह्यात अंडवृद्धीचे रुग्ण - ७६०

अंडवृद्धीवर जिल्ह्यात शस्त्रक्रिया -१७६

अंडवृद्धीच्या ऑपरेशनला नकार देणारे व्यक्ती -३४५

पाच झोनमध्ये रुग्ण

शहरातील उच्चभ्रूंच्या वस्त्या असलेले धंतोली, लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धरमपेठ आणि नेहरूनगर झोनमध्ये हत्तीरोगाचे जंतू असलेल्या व्यक्तींच्या नोंदी मिळत आहे. यामुळे या झोनमध्ये हत्तीरोग निर्मुलनासाठी पुढाकार घेऊन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मात्र शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये प्रामुख्याने हत्तीरोग निर्मूलन मोहीम राबवण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.

Nagpur
Mumbai Police: ...अन् तो पोलीस स्वतःच झाला रुग्णवाहिका, सतर्कतेचे सर्व स्तरातून होतंय कौतुक

शहरात अंडवृद्धीचे केवळ १५ रुग्ण

नागपूर महापालिकेच्या हद्दीत एक हजार व्यक्तीच्या शरीरात हत्तीरोगाचे जंतू आढळून आले आहेत. यातील ९८५ रुग्णांमध्ये हत्तीपायाचे तर १५ रुग्ण अंडवृद्धीचे आढळून आले आहेत. यामुळे महापालिकेच्या सर्वेक्षणावर शंका व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष असे की, दर दिवसाला मेडिकलमध्ये दोन ते तीन अंडवृद्धीच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येते. यानंतरही महापालिकेच्या नोंदीत मात्र केवळ १५ अंडवृद्धीच्या रुग्णांची नोंद झाली आहे. विकृतीपूर्वीच गोळ्यांचे सेवन करण्याचे आवाहन डॉ. मोनिका चारमोडे यांनी यावेळी केले.

Nagpur
Pune Crime : सहकारनगरमधील पाच सराईत गुन्हेगार हद्दपार

डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या, मग केले आवाहन

शहरातून हत्तीरोगाला हद्दपार करण्यासाठी महापालिकेने मोहिमेला सुरुवात केला. महापालिकेतील डॉक्टरांनी हत्तीरोग टाळण्यासाठी आवश्यक गोळ्यांचे नागरिकांपुढे सेवन केले. गोळ्या घेतल्यानंतर मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना गोळ्या घेण्याचे व मोहिमला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मनपाच्या नेहरूनगर झोन कार्यालय येथून हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहिमेला आज सुरुवात करण्यात आली. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती, डॉ. विजय तिवारी, माजी नगरसेविका दिव्या धुरडे, स्नेहल बिहारे यांच्यासह झोनल वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Nagpur
Mumbai Crime : वरळी हत्या प्रकरण: वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांच्या तपासाला वेग...

मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे ३१ ऑगस्टपर्यंत शहरात हत्तीरोग दुरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

हत्तीरोग संदर्भात जनजागृती करण्याकरिता मनपाच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर या झोनमध्ये जवळपास ६२४ जनजागृती बूथ उभारण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.