Nagpur : नवेगाव खैरी धरण शंभर टक्के भरले; मध्यप्रदेशात झालेल्या पावसाचा परिणाम...

मध्यप्रदेशातील चौराई धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने दोन दरवाजे उघडले.
Nagpur Navegaon Khairi Dam 100 percent full Result of rain in Madhya Pradesh
Nagpur Navegaon Khairi Dam 100 percent full Result of rain in Madhya PradeshSakal
Updated on

कन्हान - उशिरा का होईना मध्यप्रदेशात झालेल्या जोरदार पावसाचा फायदा पूर्व विदर्भाला होत आहे. ऑगस्ट लागला तरी जमिनीचे पोट भरेल इतका पाऊस अजून झाला नसल्याने मोठ्या प्रकल्पांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मध्यप्रदेशातील चौराई धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने दोन दरवाजे उघडले. हे पाणी तोतलाडोह मार्गाने नवेगाव खैरीत आल्याने धरणात जलसाठा शंभर टक्के झाला आहे.

Nagpur Navegaon Khairi Dam 100 percent full Result of rain in Madhya Pradesh
Mumbai Local Train Update : सीएसएमटी कडे जाणाऱ्या फास्ट लोकल धावतायेत उशिराने ! हे आहे कारण

चौराईच्या धरणात पाण्याचा साठा मुबलक झाल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले. हे पाणी तोतलाडोहमार्गे नवेगाव खैरीत आले.चौराईतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने नवेगाव खैरी १०० टक्के भरल्याने दोन दरवाजे उघडून पेंच आणि कन्हान नदीत विसर्ग करण्यात येत आहे.

रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात यावर्षी मान्सून उशिरा आला.तसेच अद्याप दमदार पाऊस झाला नाही. काही दिवसापूर्वी रात्री झालेल्या पावसामुळे पारशिवनी तालुक्यात १४२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Nagpur Navegaon Khairi Dam 100 percent full Result of rain in Madhya Pradesh
Mumbai Crime : पतीने घेतले उसणे पैसे म्हणून रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात घातला हातोडा

गेल्या महिन्यात सतत दोन दिवस बरसल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. १ ऑगस्टपासून मध्यप्रदेशात होत असलेल्या पावसामुळे चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. ५७२.२८ क्युसेक्स पाणी सोडल्याने मोठा प्रवाह तोतलाडोह धरणात आला आणि या धरणाची पाणीपातळीही वाढली आहे.

पावसाचे आणखी दोन महिने बाकी असल्याने जलसाठा नियंत्रणासाठी तोतलाडोहचे काही दरवाजे उघडले. नवेगाव खैरीचे दोन दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पेंच पाटबंधारे पारशिवनी उपविभागीय अभियंता मा. एन. एस. सावरकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.