Nagpur News : २४ तासांत मेडिकल-मेयोत २५ मृत्यू ;व्हेंटिलेटवरील रुग्णांना रेफरने वाढतो मृत्यूचा टक्का

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला.
nagpur
nagpursakal
Updated on

नागपूर - उपराजधानीतील खासगी रुग्णालये व्हेंटिलेटरवर अखेरच्या घटका मोजत असलेल्या रुग्णांना ऐनवेळी मेडिकल-मेयोचा रस्ता दाखवतात. मागील २४ तासांत ८ जणांना खासगी रुगणालयातून मेडिकलमध्य रेफर केले. यानंतर काही तासांतच हे रुग्ण मेडिकलमध्ये दगावले. यामुळे मेडिकल-मेयोमधील मृत्यूचा टक्का आपोआपच वाढतो. २४ तासांमध्ये मेडिकल आणि मेयोत २५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी ऑगस्टमध्ये ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तांसात २३ मृत्यू झाले होते. या पार्श्वभूमीवर नागपुरातील मेडिकल- मेयोतील मृत्यूची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मेडिकल आणि मेयोत विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलांगणा या राज्यातील अत्यवस्थ रुग्णांचा भार आहे. या रुग्णांसाठी मेडिकलला अधिकृत १ हजार ४०१ तर ट्रॉमा आणि अतिरिक्त मिळून एकूण १ हजार ८०० खाटा आहेत. तर मेयोत ८३० खाटा आहेत. दोन्ही रुग्णालयांत रोज सुमारे

२४ तासांत मेडिकल-मेयोत २५ मृत्यू

१६०० रुग्ण दाखल असतात. मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये काही औषधी रुग्णांना बाहेरून आणायला लावतात, मात्र राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तुलनेत तीन महिने पुरेल एवढा तर सर्पदंशावरील उपचारासाठी आवश्यक इंजेक्शन व इतर काही औषधांचा वर्षभर पुरेल एवढा साठा आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

nagpur
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

रात्री ७ नंतर सायरन वाजवत येतात रुग्णवाहिका

मेडिकलमध्ये २ ऑक्टोबरला २४ तासांत तब्बल १६ आणि मेयोत ९ रुग्णांचा मृत्यू झाला. नवजात शिशूंसह विविध वयोगटातील हे रुग्ण होते. मेडिकलमध्ये दगावलेल्या १६ रुग्णांपैकी ८ रुग्ण खासगीतून अत्यवस्थ अवस्थेत आणले होते. त्यांना मेडिकलमध्ये तडकाफडकी अतिदक्षता विभागात दाखल केले.

nagpur
Nagpur News : मोबाईन न दिल्याने मुलाने घेतला गळफास

परंतु २४ तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला, यामुळे हे मृत्यू मेडिकलमध्ये नोंदवले गेले. मेयोतही हीच स्थिती होती. खासगीत मृत्यूचा टक्का कमी असतो, हे दाखवण्यासाठी शेवटचा घटका मोजत असलेल्या रुग्णांना मेडिकल-मेयोत रेफर केले जाते. विशेष असे की, रात्री ७ नंतर सायरन वाजवत येणाऱ्या ॲम्बुलन्स येतात. रुग्ण सोडतात निघून जातात. नातेवाईक दाखल करण्याची प्रक्रिया करीत राहतात.

nagpur
Chh. Sambhaji Nagar : शेकडो रिक्तपदांमुळे आरोग्य यंत्रणा जर्जर ; दोन ‘मल्टिस्पेशालिटी’चा प्रस्ताव शासनाने गुंडाळला

मेडिकल टर्शरी केअर रुग्णालय आहे. येथे अत्यवस्थच रुग्णच येतात. मात्र खासगीकडून सूचना न देता अचानक रुग्ण येतात. त्यांच्यावरही उपचार होतात. रेफरल रग्ण दगावण्याची संख्या अधिक आहे. मेडिकलला २ ऑक्टोबरला २४ तासांत १६ रुग्ण दगावले. यापैकी खासगी रुग्णालयातून रेफर केलेले प्रकृती खालवलेले ८ रुग्ण दगावले. यामुळे मृत्यू वाढल्याचे दिसून येते.

डॉ. शरद कुचेवार, वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()