Nagpur News: आरोपीला दिलासा मिळाल्याने पीडितेचा उच्च न्यायालयात गोंधळ, नेमकं प्रकरण काय?

Nagpur News: आरोपी आणि पीडितेची डिसेंबर २०२२ मध्ये फेसबुकवरून मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
Nagpur News
Nagpur Newsesakal
Updated on

नागपूर: लग्नाचे आमिष दाखवून युवतीचा छळ केल्याप्रकरणी आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. याची माहिती उच्चशिक्षित पीडितेला मिळताच तिने उच्च न्यायालयाच्या परिसरात गोंधळ घालत न्यायालय प्रशासन डोक्यावर घेतले. त्यामुळे सदर पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेत तिचे समुपदेशन केले.

अश्विन चिंचुलकर (वय ३०) असे न्यायालयातून अंतरिम जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. २३ वर्षीय पीडित युवती विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण (एमएस्सी) घेत आहे. आरोपी आणि पीडितेची डिसेंबर २०२२ मध्ये फेसबुकवरून मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

यादरम्यान, अश्विनने तिला १५ ते २० वेळा हॉटेलवर नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, त्यानंतर आरोपीने पीडितेशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे लग्नाच्या बहाण्याने छळ केल्याप्रकरणी पीडितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती. याप्रकरणी आरोपींनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

मात्र, सत्र न्यायालयाने आरोपीची विनंती फेटाळून लावली. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फलके यांच्या समक्ष या प्रकरणावर सुनावणी होती. न्यायालयाने आरोपीची बाजू ऐकून आरोपींचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. (Nagpur News Update)

परंतु, पीडितेने प्रथम न्यायपीठाच्या दराजवळ, त्यानंतर प्रकरण दाखल करणाऱ्या विभागासमोर आणि नंतर पोलिस चौकीसमोर गोंधळ घातला. पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेत सदर पोलिस ठाण्यामध्ये नेले. तेथे पीडितेसह तिच्या आईचे समुपदेशन करण्यात आले.

Nagpur News
Srikanth Trailer: राजकुमार रावच्या 'श्रीकांत'चा ट्रेलर अखेर आऊट; प्रेक्षकांसाठी ठरणार पर्वणी

जामीन कायमचा नव्हे-

पीडितेने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. आरोपीला मिळालेला जामीन अंतरिम अटकपूर्व जामीन आहे, कायमचा जामीन नव्हे. या प्रकरणात अद्याप पोलिस आणि पीडितेची बाजूसुद्धा न्यायालयाने ऐकून घेतलेली नाही. मात्र, पोलिसांतर्फे घालण्यात येणाऱ्या या समजुतीचा पीडित मुलीवर कुठलाही परिणाम होताना दिसून येत नव्हता. तिला कुणीतरी चुकीची माहिती देत न्यायालयामध्ये पाठविले, अशी चर्चा परिसरामध्ये होती.

Nagpur News
Satara Lok Sabha 2024: "अनेक गोष्टी लवकरच उघडकीस येणार..."; उदयनराजेंचा शशिकांत शिंदेंना सुचक इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.