Nagpur News : डेंगी संशयित अकराशे अन् ‘किट’ फक्त दहा

त्यामुळे महापालिकेने शासनाकडे २० किटची मागणी केली होती. एका किटमधून ९० संशयितांची चाचणी करता येते.
dengue
dengue sakal
Updated on

नागपूर - शहरात डेंगीचा कहर सुरूच असून आठवडाभरात अकराशे संशयित रुग्ण आढळले आहेत. परंतु त्यांची चाचणीच्या ‘किट’ शासनाकडून केवळ दहा मिळाल्या आहेत. या किटद्वारे केवळ ९०० संशयितांची चाचणी होणार असून इतर दोनशे संशयितांची चाचणी केव्हा करणार. त्यातील एखादा डेंगीने दगावल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरात दररोज डेंगीचे रुग्ण व संशयित वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेने शासनाकडे २० किटची मागणी केली होती. एका किटमधून ९० संशयितांची चाचणी करता येते. परंतु शासनाने केवळ दहा किट देऊन महापालिकेची बोळवण केली. शहरात अकराशे संशयित रुग्ण डेंगी संशयित अकराशे अन् ‘किट’ फक्त दहा आहेत.

dengue
Satara News : पृथ्वीराज चव्हाणांच्या मागणीनंतर नितीन गडकरींनी दिले 'हे' आदेश

दहा किटमध्ये केवळ ९०० संशयितांची तपासणी होणार आहे. त्यामुळे दोनशे संशयितांना चाचणीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. या काळात योग्य उपचाराअभावी संशयिताच्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे. शासनाकडे महापालिकने आणखी २० किटची मागणी केली असल्याचे सूत्राने सांगितले.

घरोघरी सर्वेक्षण तरी रुग्णवाढ

दरम्यान शहरातील सर्व झोनमधील घरोघरी सर्वेक्षण, औषध फवारणी, धूर फवारणी, कुलरमध्ये औषधी टाकणे, गप्पीमासे सोडणे या सर्व उपाययोजना नियमितपणे मनपातर्फे करण्यात येत आहेत. मात्र यानंतरही काही भागात डेंगीच्या रुग्णांची नोंद होत आहे किंवा लारवा आढळत आहे. परिसरात व घरी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. डेंगी सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडून उपचार घ्यावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

dengue
Nagpur News : लिव्ह-इन’मधील पप्‍पा द्यायचा चिमुकल्याला सिगारेटचे चटके

सध्याचे वातावरण डासांना पोषक

सध्या नागपुरात पावसाचा खेळ सुरू आहे. मध्येच ऊन तापते. तर मध्येच पावसाच्या धारा बरसात. यामुळे हवामानातील आर्द्रता डासांसाठी पोषक वातावरण ठरत आहे. त्यातच शहरातील अनेक वस्त्यांमध्ये घरोघरी कुलर दिसतात. कुलरमधील पाणी आठवडे, महिने लोटून गेल्यानंतरही बदलले गेले नसल्याचे चर्चेतून पुढे आले. डासोत्पत्ती कमी होत नाही, तोवर उद्रेक नियंत्रणात येणे शक्य नसल्याचे अधिकारी खासगीत सांगतात.

dengue
Solapur News : शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यासमवेत तीन दिवसीय गाव भेट दौरा-आ.समाधान आवताडे

अशी घ्यावी काळजी

घराच्या सभोवताल, छतावरील टायर, नारळाच्या करवंटया, रिकामे डबे, पाण्याचे टाके, कुंड्या, कुलरमध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.

आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा.

लहान मुलांना संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे.

घरी कुलर बंद करून पाण्याची टाकी स्वच्छ पुसून कोरडी करावी.

परिसरातील साचलेले पाणी वाहते करावे

पाण्याची भांडी, टाकी, ओव्हरहेड टॅंक, यावर झाकण लावावे.

डेंगी सदृश्य ताप आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडून उपचार करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()