Nagpur News : उपराजधानीत दोन ठिकाणी आग

एक्सप्लोर गेमिंग झोनसह खाद्य पदार्थांचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी
nagpur
nagpursakal
Updated on

हिंगणा - शहर परिसरात शनिवारी दोन ठिकाणी आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळाले. यात एक घटना हिंगणा एमआयडीसी परिसरात तर दुसरी गोटाळपांजरी येथे घडली. दोन्हीत जीवितहानी झाली नाही. एमआयडीसीतील वाडी टोल नाक्याजवळ प्लॉट क्र. सी ४९ मध्ये सुमारे दहा हजार चौरस फुटात असलेल्या शेडमध्ये न्यू एकस्पलोर गेमिंग झोन आणि मनोरंजन केंद्राला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. यात लाखो रुपयांची गेमिंगची आणि मनोरंजनची साधने जळून खाक झाली.

वाडी अग्निशमन दल आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी आग विझवण्यात यश आले. आगीचे कारण अद्यापही कळू शकले नाही. मात्र या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

प्राप्त माहितीनुसार, नुकतेच एक महिन्याआधी या गेम झोनचे उद्‍घाटन करण्यात आले. काही दिवस सुरू केल्यानंतर अचानक काही धोकादायक तांत्रिक बाबी उद्‍भवल्याने या गेम झोनला बंद करण्यात आले. दरम्यान धोकादायक अडचणी दूर करण्याचे काम सुरू होते. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास गेम झोन च्या आत वेल्डिंगचे काम सुरू असताना स्पार्किंग झाले व ट्रॅम्पोलिंग (स्पंच/गादी) पार्कला आग लागली. पाहता पाहता आगीने आत असलेल्या ट्रॅम्पोलिंगसह इतर साहित्याला कवेत घेतल्याने मोठ्या प्रमाणात बाहेर धूर येऊ लागला.

nagpur
Nagpur News : जातीसाठी पुरावे शोधणे शासनाचे काम नाही; ओबीसी मुक्ती मोर्चाची समिती विरोधात याचिका

कामगारांनी तातडीने याची माहिती कंपनी संचालकाला दिली. सूचना मिळताच एमआयडीसी पोलिसांनी लगेच अग्निशमन विभागाला माहिती देऊन तीन बंब पाठविले. पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. या गेमिंग झोनला तयार करण्यासाठी तीन वर्षे लागली होती. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.

गेमिंग झोनमध्ये ट्रंमपोलिन, बॉलिंग, क्रिकेट इत्यादी एकूण ५० खेळ होते. गेमिंग झोन पूर्णपणे आगीच्या विळख्यात सापडले. पोलिस उपायुक्त अनुराग जैन, सहा. पोलिस आयुक्त प्रवीण तेजाळे, एमआयडीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके हे घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाचे अधिकारी आनंद परब व त्यांच्या पथकाने तीन तासात आगीवर नियंत्रण मिळविले. विझवली.मात्र तोवर लाखोंचा माल जळून खाक झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

nagpur
Beed News : कर्तव्याची नियत, तर हजेरीला नकार का?

नागपूर -बेसा-घोगलीजवळ गोटाळपांजरी गावातील संचेती स्कूलला लागून असलेल्या खाद्य पदार्थांच्या गोदामाला शनिवारी सकाळी आग लागली. यात लाखो रुपयांचे फरसाण पॅकेट जळाले. महापालिका व मिहानच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले.

गोटाळपांजरी गावात मनीषनगर येथील रहिवासी मेघा पाटील यांचे अवी एजन्सी नावाने प्रतिष्ठान आहे. या एजन्सीद्वारे एका खाजगी कंपनीच्या फरसाण, मिठाई या उत्पादनाचे वितरण केले जाते. त्यामुळे नेहमीच लाखो रुपयांचे फरसाण, मिठाई गोदामात असते. शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास या टिनाचे शेड असलेल्या गोदामाला आग लागली.

nagpur
Satara News : वनवासमाचीजवळ युवकाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

यावेळी यात २० लाखांचे फरसाण, मिठाई आदी होती. महापालिका तसेच मिहान येथील अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन जवानांनी टिनाचे शेड काढले. त्यानंतर आगीवर पाण्याचा मारा केला. परंतु यात पूर्ण फरसाण व मिठाईचे पॅकेट जळाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या व मिहान अग्निशमन केंद्राच्या प्रत्येकी दोन गाड्यांनी पाण्याचा मारा केला. दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळविल्याचे मिहान अग्निशमनचे मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश खरटमल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.