Nagpur News : उत्तर प्रदेशातून कासव तस्करी करणारा मुख्य सूत्रधार अटकेत

वनविभागाची कारवाई मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
nagpur
nagpursakal
Updated on

नागपूर - जीटी एक्सप्रेसमधून दुर्मीळ कासवांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधार अतिक अन्सारीला शुक्रवारी नागपूर वनविभागाच्या पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन अटक केली. नागपूर कासव तस्करीचे हब बनत असल्याची माहिती उजेडात आल्यानंतर नागपुरातील वनविभागाच्या पथकाने उत्तरप्रदेशात जाऊन अशी अटक करण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे कासवाच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

यापूर्वीही चेन्नई आणि कोलकत्ता येथेही कासव तस्करांना अटक केल्याचे तस्करांचे धाबे दणाणले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने ३० सप्टेंबरला तीन जणांना कासवाची तस्करी करताना अटक केली होती. त्यांच्याकडून अत्यंत दुर्मीळ आणि मौल्यवान ५४१ कासव ताब्यात घेतले होते. त्यातील ४८३ जिवंत छोटे कासव होते. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले होते.

उत्तर प्रदेशातून कासव तस्करी करणारा मुख्य सूत्रधार अटकेत

न्यायालयाने मोहम्‍मद अहमद लाला मोहम्मद, फुलजादी मोहम्मद अहमद, सादिक हुसेन महंमद यांना सात ऑक्टोबरपर्यंत वनकोठडी देण्यात आली होती. त्यातील एका आरोपीला वनविभागाच्या विशेष पथकाने आरोपीची ओळख पटविण्यासाठी उत्तरप्रदेशात घेऊन गेले होते.

nagpur
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

दरम्यान, उत्तर प्रदेशातील उन्ना जिल्ह्यातील सुक्लागंज येथे येथे लपून बसलेल्या मुख्य सूत्रधाराला अतिशय शिताफीने चमूने सापळा रचून मुसक्या आवळल्या. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपीला शनिवारी (ता.७) नागपूर शहरात आणण्यात येणार आहे. यामुळे या आरोपीकडून कासवांच्या तस्करीचे मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

nagpur
Nagpur News : ‘ऑक्टोबर हीट’ने नागपूरकर हैराण

उत्तर प्रदेशाच्या चमूमध्ये वन क्षेत्रपाल आशिष निनावे (अवैध शिकार प्रतिबंधक पथक), आर.एच. इपाची, ए.एम. गिरी, वनरक्षक आर. पी. चौधरी, जी.बी. लामतुरे यांचा समावेश आहे. वनविभागाच्या ताब्यात असलेले कासव सध्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आहे.

nagpur
Nagpur News : टेंशन घेऊ नको बाळा, फक्त प्रयत्न कर ! सामन्यापूर्वी आई अर्चनाने दिला होता ओजसला धीर

त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी तयारी केली जात आहे. चमूही तयार करण्यात येत आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक भरत सिह हाडा यांच्या नेतृत्वात करण्यात आली. ते नियमित उत्तर प्रदेशात पाठविलेल्या चमूची नियमित आढावा घेत होते. त्यांना सहाय्यक वनरक्षक विजय गंगावने, वन परीक्षेत्र अधिकारी सारीका वैरागडे या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.