Nagpur News : सक्तीची ‘ई-पीक पाहणी’ ठरली डोकेदुखी नेटवर्कचा अभाव ; तांत्रिक ज्ञानापासून शेतकरी अनभिज्ञ

राज्य शासनाचा कृषी विभाग लहानसहान कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो.
nagpur
nagpursakal
Updated on

हिंगणा - अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची ‘ई-पीक पाहणी’ कृषी विभागाने सक्तीची केली आहे. पण मोबाईलच्या तांत्रिक ज्ञानापासून तालुक्यातील अनेक शेतकरी अनभिज्ञ आहे. तसेच अनेक भागात मोबाईल कव्हरेज नाही. यामुळे अल्पशिक्षित शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणी’ डोकेदुखी ठरत आहे.

राज्य शासनाचा कृषी विभाग लहानसहान कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो. मात्र शेतकऱ्यांच्या पीक पाहणीसाठी कर्मचारी का नेमू शकत नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. हिंगणा तालुक्यात बहुतेक शेतकरी अल्पशिक्षित असून त्यापैकी फारच थोड्यांना मोबाईलचे तांत्रिक ज्ञान अवगत आहे. याची स्पष्ट जाणीव असतानाही ‘ई पीक पाहणी’ सक्तीची केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

लोकप्रतिनिधींना मात्र शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राज्याचे कृषी मंत्री, कृषी विभागाचे मंत्रालयीन सचिव व सर्व वरिष्ठ अधिकऱ्यांनी या पीक पाहणीतील अडचणी लक्षात घेऊन उपाययोजना कराव्या, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे.

nagpur
Mumbai News : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट ; कोणते मंत्री येणार अडचणीत ?

विशेष म्हणजे शेतकरी या ॲपच्या माध्यमातून माहिती पाठवू शकत नसल्याने तालुका कृषी कार्यालयातील कर्मचारी स्वतः जाऊन पंचनामे करीत आहेत. पण शेतात रेजच नसल्याने त्यांनाही अडचण येत आहे.

nagpur
Sangli News : १९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचे उपोषण 'ह्या' आहेत मागण्या

पठारांवरील गावांत ॲप चालणे कठीण

तालुक्यातील पठारावरील २८ गावांतील शेतात इंटरनेट कव्हरेज नाही. त्यामुळे पीक पाहणी ॲप मोबाईलमध्ये चालत नाही. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतात झालेल्या नुकसानीचे फोटो अपलोड करून नुकसान भरपाईसाठी नोंदणी करावी लागते. पण हे ॲपच अनेक भागात इंटरनेटअभावी चालत नाही. प्रत्येक गावात सुशिक्षित तरुण, तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील, कृषिमित्र, ग्रामपंचायतचे कॅम्पूटर ऑपरेटर असतात. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली असती तर अचूक माहिती शासनाला प्राप्त झाली असती.

मात्र शेतकऱ्यांना त्रास देऊन त्यांची अडवणूक करण्याची व्यवस्था तर केली जात नाही ना असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

अपूर्ण अहवाल शासनाला सादर - उज्वला बोढारे

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले. ई पंचनामे शेतात जाऊन प्रत्यक्ष मोबाईल द्वारे करण्यात आले. मात्र हिंगणा तालुक्यातील पठारावरील २८ गावांत अनेक ठिकाणी मोबाईलचे कव्हरेज नाही.

nagpur
Chh. Sambhaji Nagar : स्वच्छतागृहात लावले खासदार हेमंत पाटील यांचे पोस्टर, ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन

अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. अशा परिस्थितीत ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवका मार्फत ई पंचनामे करण्यात आले. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ई-पंचनामे अद्यापही झालेले नाही. अशा परिस्थितीत घाई गडबडीत तहसील कार्यालयाने ई-पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे सादर केला. हा अहवाल अपूर्ण असून अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे ऑफलाइन पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी माजी जि.प.महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोढारे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.