Nagpur News : महाराष्ट्रातील बहुतांश भागात ऑगस्ट महिना काेरडा गेल्याने दुष्काळाचे सावट गडद

श्रावण महिन्यातही ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून धरणातून विसर्ग होण्याची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
nagpur news
nagpur news sakal
Updated on

Nagpur News : शेतीची धूळधाण

उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत वीस लाख ६५ हजार सरासरी क्षेत्रापैकी १९ लाख ९८ हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यापैकी ८८ महसूल मंडळातील ६ लाख हेक्टरवरील खरीप पिकांची धुळधाण झाली आहे.

हे क्षेत्र कोरडवाहू असून शेतकऱ्यांच्या जवळपास पावणेतीन हजार कोटींच्या उत्पादनावर पाणी पडले आहे. राज्यात सर्वांत कमी पावसाच्या विभागामध्ये नाशिकचा समावेश आहे.

टंचाईच्या झळांनी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत घशाला कोरड वाढत चालली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसाला दुष्काळाची चाहूल लागली असल्याने उत्तर महाराष्ट्रातील गावांमधून दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

त्यातच, डाळींसह शेंगदाण्याची महागाई झाली आहे. मालेगावमध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. दरम्यान, पावसाअभावी वाया गेलेल्या पिकांमध्ये कापसाचे क्षेत्र चार लाख, मक्याचे क्षेत्र दीड लाख, सोयाबीनचे क्षेत्र पन्नास हजार हेक्टर असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे

. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंतच्या सरासरीच्या ५३.८ टक्के, धुळे जिल्ह्यात सरासरीच्या ६४.४ टक्के, नंदुरबार जिल्ह्यात सरासरीच्या ६१ टक्के आणि जळगाव जिल्ह्यात ७०.१ टक्के पाऊस पडला आहे.

nagpur news
Vitamin D Deficiency : महिलांनो शरीरातील Vitamin D ची कमतरता ठरू शकते घातक, इग्नोर करू नका; नाहीतर..

पिकांची वाढ खुंटली नाशिक-पूर्व भागातील पिकांची वाढ खुंटली.

(५० टक्के नुकसानीचा अंदाज)

जळगाव जिल्ह्यात ६० टक्के भागातील पेरण्या धोक्यात आल्या.

पश्‍चिम भागात टंचाईची समस्या बळावली

धुळे जिल्ह्यात ७० टक्क्यांहून अधिक खरीप संकटात.

शेतीवर अवलंबून असलेले ८० टक्के अर्थकारण अडचणीत.

नंदूरबार जिल्ह्यात ऊन पडत असल्याने पिके वाळत आहेत.

नाशिक जिल्ह्यात ७५ गावे आणि ६२ वाड्यांसाठी ६० टँकर सुरू असून जळगाव जिल्ह्यांतील १३ गावांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

nagpur news
Dhule Drought News : जायेल देव पोयाले परत येस म्हणे..! दुभत्या पशुधनाला चाराटंचाईची झळ

धरणसाठा

उत्तर महाराष्ट्रातील मोठे २३ प्रकल्प असून त्यात ७२.३५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी ९० टक्के मोठे प्रकल्प भरले होते. तसेच मध्यम प्रकल्प ५४ असून त्यात ४९.९९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या धरणात ६९.७७ टक्के साठा होता. या विभागात ४६० लघुप्रकल्प असून त्यात ३०.७७ टक्के साठा आहे. गेल्या वर्षी ४८.२२ टक्के साठा होता.

भातशेतीवर परिणाम

रत्नागिरी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खरिपातील भात शेतीवर परिणाम दिसू लागला आहे. याचा परिणाम हळव्या जातीच्या भात बियाण्यांवर होणार आहे. फुटवा येण्याच्या वेळीच सातत्य नसल्याने उत्पादनात घट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत पडणाऱ्या सरासरीपेक्षा सहा टक्के कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत सरासरी २५२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

nagpur news
Sakal Podcast : घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २००ची घट ते मंत्रालयात शेतकऱ्यांचे आंदोलन

ऑगस्टपर्यंत सरासरी २६६७ मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी याच कालावधीत २९६१ मिलिमीटर नोंद झाली होती. यावर्षी ‘एलनिनो’मुळे अपेक्षित सरासरीही गाठता आलेली नाही. जून आणि ऑगस्ट हे दोन्ही महिने पावसासाठी यथातथाच गेले आहेत. त्याचे परिणाम आपसूकच भातशेतीवर दिसून येत आहेत. जूनमध्ये पाऊस लांबल्यामुळे भात लावण्यांना पंधरा दिवस विलंब झाला होता. तर ऑगस्ट मध्ये कमी पाऊस झाल्याने करपा, पाने गुंडाळणारी अळीसारखे रोग दिसू लागले आहेत.

उशिराने लावलेल्या खाचरातील भात रोपांवर परिणाम होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी मॉन्सून उशिरा दाखल झाला. त्यामुळे जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत सरासरीपेक्षा पाऊस खूपच कमी पडला. मात्र, त्यानंतर सातत्याने १५ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने हा बॅकलॉग भरून काढला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत पडलेला पाऊस पाहता येत्या महिनाभरात पावसाने पाठ फिरवली तरी जिल्ह्याच्या स्थितीवर कोणताही दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही.

रोपे आडवी पडण्याची शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यात भविष्यात गुरांना हिरव्या चाऱ्यांचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

रत्नागिरीच्या प्रत्येक तालुक्याला २० ते ३० हजार गवताचे ठोंबे वाटप.

सध्या भाजीच्या किमती वधारलेल्या. भाजीऐवजी कडधान्य वापरावर भर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत २४०० मिमी पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु व पाटबंधारे धरणांची पातळी समाधानकारक आहे.

रायगड जिल्ह्यात जून महिन्यात फक्त ४७.४ टक्के पाऊस .

पनवेलला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणात हिवाळ्यापर्यंतचा पाणीसाठा.

जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे २८ लघुपाटबंधाऱ्यांपैकी १३ बंधारे शंभर टक्के भरले.

सप्टेंबरमध्ये पाऊस झाला नाही तर रोपे आडवी पडण्याची शक्यता.

रत्नागिरी, सिंधुदुर्गात समाधानकारक साठा

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ धरण प्रकल्पातील २९ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. सरासरी ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहेत. त्यामुळे सुरवातीच्या काळात टंचाईची तीव्रता अधिक जाणवणार नसली तरीही पुढील वर्षीच्या एप्रिल, मे महिन्यात पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

ऑगस्टपर्यंतच्या स्थितीवरून हा अंदाज बांधला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु व पाटबंधारे धरणांची पाणी पातळी समाधानकारक आहे. नद्यांची पातळी सुद्धा पोषक आहे. परिणामी सध्यातरी शेती आणि पिण्याच्या पाण्याची कोणतीही काळजी नाही .

रत्नागिरी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खरिपातील भात शेतीवर परिणाम दिसू लागला आहे. याचा परिणाम हळव्या जातीच्या भात बियाण्यांवर होणार आहे. फुटवा येण्याच्या वेळीच सातत्य नसल्याने उत्पादनात घट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

जून ते ऑगस्ट या कालावधीत पडणाऱ्या सरासरीपेक्षा सहा टक्के कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत सरासरी २५२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्टपर्यंत सरासरी २६६७ मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी याच कालावधीत २९६१ मिलिमीटर नोंद झाली होती. यावर्षी ‘एलनिनो’मुळे अपेक्षित सरासरीही गाठता आलेली नाही. जून आणि ऑगस्ट हे दोन्ही महिने पावसासाठी यथातथाच गेले आहेत.

त्याचे परिणाम आपसूकच भातशेतीवर दिसून येत आहेत. जूनमध्ये पाऊस लांबल्यामुळे भात लावण्यांना पंधरा दिवस विलंब झाला होता. तर ऑगस्ट मध्ये कमी पाऊस झाल्याने करपा, पाने गुंडाळणारी अळीसारखे रोग दिसू लागले आहेत. उशिराने लावलेल्या खाचरातील भात रोपांवर परिणाम होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी मॉन्सून उशिरा दाखल झाला. त्यामुळे जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत सरासरीपेक्षा पाऊस खूपच कमी पडला.

मात्र, त्यानंतर सातत्याने १५ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने हा बॅकलॉग भरून काढला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत पडलेला पाऊस पाहता येत्या महिनाभरात पावसाने पाठ फिरवली तरी जिल्ह्याच्या स्थितीवर कोणताही दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही.

पिके कोमात

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्हे वगळता इतरत्र पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी पिके माना टाकत आहेत. मका वाळत असून कापसाची वाढ खुंटली आहे. सोयाबीन फुलोऱ्यात आहे, सध्या सोयाबीनला पाण्याची गरज आहे. त्यामुळे आता जर पाऊस झाला नाही तर खरीप हातचा जाण्याची भीती आहे. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तीन महिन्यांत ३३ दिवस पाऊस

आठ जिल्ह्यांत आतापर्यंत सरासरीच्या ४८.४३ मिलिमीटर पाऊस.

नांदेड आणि हिंगोली ही दोन जिल्हे वगळता अन्य सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प.

जूनपासून पावसाच्या ८५ दिवसांत केवळ ३३ दिवस पाऊस तर ५२ दिवस कोरडेच.

३८ महसूल मंडळांत २५ ते ५० टक्केच पाऊस. २०६ महसूल मंडळांत ५० ते ७५ टक्के पाऊस.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ४८.५७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ४८.२३ लाख हेक्टरमध्ये पेरणी.

मराठवाडा विभागात सध्या २१ लाख ७७ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध.

पिण्याच्या पाण्यासाठी मराठवाड्यात आताच ८४ टॅंकर सुरू आहेत, याची संख्या वाढेल.

२३ टक्के उपयुक्त साठा

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ४३ टक्के साठा असून गेल्या वर्षी ऑगस्टअखेरच्या आठवड्यात ८८ टक्के पाणीसाठा होता. जायकवाडी धरणात सध्या ३४ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी ऑगस्टअखेरच्या आठवड्यात ९६ टक्के धरण भरले होते. मराठवाडा विभागातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त २३ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून गेल्या वर्षी ६८ टक्के साठा होता. लघुप्रकल्पांमध्ये २१ टक्के साठा असून गेल्यावर्षी हा साठा ५८ टक्के होता.

तहान भागेना!

यं दाच्या पावसाळ्यात वरुणराजाने आतापर्यंत घोर निराशा केल्याने विदर्भातही सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरेशा पावसाअभावी बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून, धरणांचीही पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे.

त्यामुळे बळीराजा चिंतित आहेच, शिवाय आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचीही भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.येत्या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस पडला नाही तर दुष्काळाची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांत गंभीर स्थिती

पूर्व विदर्भात आतापर्यंतचा अपेक्षित पाऊस ८०० मिलिमीटर होता. मात्र आतापर्यंत पडलेल्या पावसाने ७०० मिमीचाही आकडा ओलांडला नाही.

पश्चिम विदर्भातील अमरावती अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांवर गंभीर दुष्काळाचे सावट घोंघावण्याची चिन्हे

गडचिरोली वगळता विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यात पावसाने अपेक्षित आकडा गाठला नाही.

चालू हंगामात जर पावसाने तूट भरून काढली नाही तर खरीपाच्या उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका .

अल्प पावसाचा परिणाम रब्बी पिकांवरही होण्याची शक्यता.

विदर्भातील एकूण पावसाचा विचार केल्यास, विदर्भात १ जून ते २९ ऑगस्टदरम्यान ६७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, जो सरासरी पावसाच्या (७४० मिलिमीटर)

जवळपास दहा टक्के कमी.

विदर्भातील अकरापैकी अमरावती (उणे ३५ टक्के), अकोला (उणे ३१ टक्के), बुलडाणा (उणे २३ टक्के) आणि गोंदिया (उणे २१ टक्के) या चार जिल्ह्यांमध्ये सर्वांत कमी पावसाची नोंद.

वाशीम (उणे १८ टक्के) व वर्धा (उणे १३ टक्के) येथेही अपेक्षेपेक्षा कमी.

धरणांचीही स्थिती नाजूक

नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ७७ टक्के जलसाठा आहे, जो गेल्या वर्षीच्या (८३ टक्के) तुलनेत सहा टक्के कमी आहे. याशिवाय ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये ८७ टक्के साठा उपलब्ध आहे, जो गेल्यावर्षीच्या (९५ टक्के) तुलनेत कमीच आहे. अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ६९ टक्के (गेल्या वर्षी ८८ टक्के) आणि २५ मध्यम प्रकल्पांमध्ये ७७ टक्के (गेल्या वर्षी ८८ टक्के) जलसाठा शिल्लक आहे. विदर्भातील बहुतांश मोठी धरणे पूर्ण भरलेली नाहीत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्दसारखा मोठा प्रकल्प तर ५० टक्केही भरलेला नाही. याच जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाचीही स्थिती तशीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.